Unique wedding in nanded  Saam tv
महाराष्ट्र

Unique wedding :...म्हणून त्यांनी केले स्मशानभूमीत लग्न; आगळ्या वेगळ्या विवाहाची सर्वत्र चर्चा

unique wedding in Cemetery : स्मशानभूमी म्हणजे अंत्यविधी करण्याचं ठिकाण... पण नांदेडमध्ये स्मशानभूमीत विवाह पार पडला आहे. नांदेडच्या देगलूर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत हा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला आहे.

Vishal Gangurde

संजय सूर्यवंशी, नांदेड

Unique Wedding in Nanded Cemetery :

स्मशानभूमी म्हणजे अंत्यविधी करण्याचं ठिकाण... पण नांदेडमध्ये स्मशानभूमीत विवाह पार पडला आहे. नांदेडच्या देगलूर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत हा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला आहे. या आगळ्या वेगळ्या विवाहाची सर्वत्र चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

हिरेवार आणि कोंडपल्ली या कुटुंबातील हा आगळा वेगळा विवाह सोहळा होता. या आगळ्या वेगळ्या विवाहाची गावात सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. विवाह सोहळा स्मशानभूमीत आयोजित का करण्यात आला, याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.

विवाह सोहळ्यात स्मशानात का आयोजित केला?

स्मशानातच हा विवाह सोहळा का आयोजित केला असावा ? असा प्रश्न देखील अनेकांना पडला असेल. परंतु यातील देगलूर येथील गोविंद कोंडपल्ली हे वैकुंठधाम स्मशानभूमीत काम करतात.

त्यामुळे गोविंद कोंडपल्ली यांनी आपल्या कन्येचा विवाह सोहळा ते जिथं काम करतात, त्याच स्मशानभूमीत करण्याचे त्यांनी ठरवले. या विवाहाच्या ठिकाणामुळे एक नवा पायंडा त्यांनी पाडला.

गोविंद कोंडपल्ली यांची कन्या लक्ष्मी आणि तेलंगणा राज्यातील म्हैसा येथील सायलू हिरेवार यांचे चिरंजीव आकाश यांचा आज या स्मशानात विवाहबंधनात अडकले.

या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्यास आमदार जितेश अंतपुरकर यांच्यासह तालुक्यातील नेते मंडळींची देखील उपस्थिती होती. स्मशानातील या विवाह सोहळ्याची चर्चा मात्र जिल्हाभर होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: केस ओढले, लाथा बुक्क्यांनी मारहाण अन्....; विद्यापीठात विद्यार्थिनींचा राडा

Amruta Khanvilkar : नऊवारी पैठणी, हातात हिरवा चुडा अन्...; नव्या नवरीसारखी नटली अमृता खानविलकर, फोटोवरून नजर हटणार नाही

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

Nagpur : गणित चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण, शिक्षकांची पालकांनाही धमकी, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना

America Attack On Iran: अमेरिकेचा इराणवर आतापर्यंचा सर्वात मोठा हल्ला, 'ऑइल हब' असलेले खार्ग बेट उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT