Sangamner crime news  Saam TV
महाराष्ट्र

Sangamner Crime News: धक्कादायक! संगमनेर तालुक्यात दिल्ली गुप्तचर विभागाची धडाकेबाज कारवाई

Ahilyanagar News: संगमनेरमध्ये दिल्ली गुप्तचर विभागाची मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

Saam Tv

सचिन बनसोडे,साम टीव्ही

संगमनेर |अहिल्यानगर: संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात बनावट नोटा छापणाऱ्या एका घरावर पुणे गुप्तचर विभागाने धाड टाकून कारवाई केली आहे. दिल्ली गुप्तचर विभागाच्या आदेशानुसार ही धाड टाकण्यात आली. कारवाईदरम्यान, नोटा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर, विशेष प्रकारचा कागद आणि इतर साहित्य पोलिसांच्या हाती लागले आहे.

असा आला बनावट नोटांचा छापखाना उघडकीस,

गुंजाळवाडी परिसरात एका घरात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा छापल्या जात असल्याची माहिती दिल्ली गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानंतर, पुणे गुप्तचर विभागाने संगमनेर पोलिसांसह संयुक्त कारवाई करत संबंधित घरावर छापा टाकला. या छाप्यात प्रिंटर, बनावट नोटांसाठी वापरण्यात येणारा कागद आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

बनावट नोटा छापणारा रजनीकांत रहाणे याची कसून चौकशी सुरू आहे. या नोटा कुठे चलनात आणल्या जात होत्या आणि छपाईसाठी लागणारा कागद कुठून आणला जात होता, याचा तपास पोलीस करत आहेत. ग्रामीण भागात अशा प्रकारचा बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार,

या कारवाईत मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. संशयिताची चौकशी सुरू असून, या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक केली आहे. तसेच, बनावट नोटा प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT