कोरोनाचा 'सुपर म्युटंट व्हेरिएंट' अत्यंत धोकादायक; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा Saam Tv News
महाराष्ट्र

कोरोनाचा 'सुपर म्युटंट व्हेरिएंट' अत्यंत धोकादायक; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

कोरोनाचा 'सुपर म्युटंट व्हेरिएंट' अत्यंत धोकादायक असून तीन जणांपैकी एकाचा मृत्यू होईल असा अंदाज आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

जगामधल्या अनेक देशांमध्ये डेल्टा विषाणूने चिंता वाढवलीय. आता पुन्हा सुपर म्यूटंट व्हेरिएंटबाबत अमेरिका आणि इंग्लडमधील शास्त्रज्ञांनी गंभीर इशारा दिलाय. कोरोनाचा 'सुपर म्युटंट व्हेरिएंट' अत्यंत धोकादायक असून तीन जणांपैकी एकाचा मृत्यू होईल असा अंदाज आहे. जगातल्या जवळपास ११३ देशांमध्ये कोरोनाच्या डेल्टा विषाणूचा फैलाव सुरू आहे. सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा विषाणूमुळे कोरोनाची चिंता अधिक वाढवलीय. अमेरिकेच्या 'सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल म्हणजेच सीडीसीने गंभीर इशारा दिलाय. आता गाफील राहणाऱ्यांची खैर नाही असं स्पष्ट केलंय. डेल्टामुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या अनुषंगाने स्पष्ट संदेश प्रसारित करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीकरणाची सक्ती आणि मुखपट्टीचा वापर या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब पुन्हा एकदा करण्याची आवश्यकता सीडीसीने सांगितली आहे. (Corona's 'super mutant variant' extremely dangerous; Serious warning from scientists)

हे देखील पहा -

कोरोना विषाणूचा डेल्टा हा उत्परिवर्तित प्रकार प्रथम भारतात आढळला आणि आता त्याचा फैलाव जगभरात झाल्याचे 'सीडीसी'च्या अंतर्गत कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. हा विषाणू कांजण्यांच्या विषाणूप्रमाणे वेगाने पसरतो. तसेच सर्दीच्या विषाणूपेक्षाही त्याचा प्रादुर्भाव वेगाने होतो, असेही 'सीडीसी'ने म्हटले आहे. जगात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने १९ कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. प्रगत देश कोरोनाच्या महाभयंकर संकटापुढे हतबल झाले.

गेल्या दीड वर्षांपासून जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचे सर्वात जास्त धोकादायक रूप आता समोर आले आहे. येत्या काळात हा नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक होऊन तीनपैकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागत असल्याचा दावा ब्रिटनमधीलही वैज्ञानिकांनी केला आहे. सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा विषाणूमुळे कोरोनाची चिंता अधिक वाढवलीय. अमेरिकेच्या 'सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल म्हणजेच सीडीसीने गंभीर इशारा दिलाय. ब्रिटनमधील सायंटिफिक अॅडव्हायझरी ग्रुप फॉर इमर्जन्सीने याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालानुसार, कोरोनाचा भविष्यात येणारा व्हेरिएंट एमईआरएस व्हेरिएंटपेक्षाही अधिक प्राणघातक असू शकतो.

या व्हेरिएंटमुळे जगभरात मृत्यू दर जवळपास ३५ टक्के एवढा राहण्याची शक्यता आहे. या संशोधनात केलेल्या दाव्यानुसार, तीन जणांपैकी एकाचा मृत्यू अटळ आहे. असे झाले तर जगभर मृत्यूदरात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्कता आणि काळजी घेणं हेच आपल्या हातात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SIP Calculator: २० वर्षांसाठी १०,००० रुपयांची SIP करा, अन् महिन्याला ६५,००० मिळवा; सोप्या शब्दात कॅल्क्युलेशन समजून घ्या

Badlapur-Karjat : बदलापूर-कर्जतसाठी मोदींनी घेतला मोठा निर्णय, लोकल प्रवास होणार सुसाट, मुंबई-पुणेकरांसाठीही फायदा

Maharashtra Live News Update : पुण्यात दिवसा ऊबदार वातावरण, पहाटे कडाक्याची थंडी

Shani Gochar 2026: 2026 साली या राशींचं भाग्य उजळणार; नवी नोकरी पैसा मिळून तुम्ही होणार करोडपती

Gold Rate Prediction: सोन्यात आता ५ लाख गुंतवले तर २०३० मध्ये किती रिटर्न मिळणार? वाचा कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT