Corona Update 
महाराष्ट्र

Corona Virus Update: कोरोनानं टेन्शन वाढवलं; राज्यात आज ३३ रुग्ण, एकट्या मुंबईत २२ जण पॉझिटिव्ह

Corona Update: कोरोनाच्या कमबॅकने राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झालीय.

Bharat Jadhav

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

भारतात पुन्हा एकदा कोविडचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागलीय. राजधानी दिल्लीसह ११ राज्यात पुन्हा कोरोना रूग्ण आढळलेत. महाराष्ट्रात तर कोरोना रुग्णसंख्येने शंभरी गाठलीय. आज कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ झाली असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३३ झालीय. यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबईमध्ये २२, तर पुणे शहरात ५, पिंपरी चिंचवडमध्ये २, ठाणे ३ आणि लातूरमध्ये १ रुग्ण आज आढळून आलाय. दरम्यान आजपर्यंत ६१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात जानेवारी पासून ६४७७ कोविड चाचणी झालीय. सर्व निदान झालेले रुग्ण हे सौम्य स्वरूपाचे आहेत. कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलीय. दरम्यान या रुग्ण वाढीचे मुख्य कारण कोरोनाचा नवीन ओमिक्रॉन उप-प्रकार JN.1 असल्याचे सांगितलं जात आहे.

२१ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालात महाराष्ट्रात कोरोनाचे ५३ सक्रिय रुग्ण आढळले. आता ओडिशामध्येही याचा एक प्रकार आढळून आलाय. मंगळवारी जाहीर झालेल्या माहितीनुसार, मुंबईत ४ महिन्याच्या एका बाळाला कोविडची लागण झाली होती. के.जे. सोमय्या रुग्णालयात बाळावर उपचार सुरू आहेत. तर १६ रुग्णांवर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातही तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलाय. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय आहे JN.1 व्हेरियंट?

आकाश हेल्थकेअरच्या अंतर्गत औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार आणि प्रमुख डॉ. राकेश पंडित यांनी याबाबत माहिती दिलीय. JN.1 हा ओमिक्रॉनच्या BA.2.86 म्हणजेच 'पायरोला' प्रकारापासून विकसित झालेला उपप्रकार आहे. हे अधिक वेगाने पसरू शकते आणि प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकते.

काय आहेत लक्षणं

JN.1 प्रकाराची लक्षणे सामान्य ओमिक्रॉन संसर्गासारखीच आहेत, परंतु काही प्रकरणांमध्ये थोडेसे बदल दिसून आलेत.

ताप किंवा थंडी वाजून येणे.

खोकला, घसा खवखवणे.

सर्दी किंवा बंद झालेले नाक.

थकवा, अंगदुखी.

डोकेदुखी.

चव आणि वास येणे कमी होणे.

काही प्रकरणांमध्ये मळमळ किंवा अतिसार सारख्या पोटाच्या समस्यातदेखील आढळून आल्या आहेत. लसीकरण झालेल्या लोकांमध्ये लक्षणे सामान्यतः सौम्य असतात. वृद्ध आणि पूर्वीपासून आजार असलेल्यांना अधिक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT