lockdown
lockdown 
महाराष्ट्र

अर्धा नगर जिल्हा हॉटस्पॉट, लॉकडाउनचे संकट

Ashokraje Nimbalkar

अहमदनगर ः गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. तिसरी लाट कधी येईल हेही निश्चितपणे सांगता येत नसले तरी नगर जिल्ह्यात कोरोनाने धुडगूस घातला आहे. जवळपास अर्धा जिल्हा वाढत्या रूग्णसंख्येमुळे परेशान आहे.

जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापनाची बैठक बोलावण्याची शक्यता आहे. पारनेर आणि संगमनेर तालुक्यात मोठी संख्या आहे. तेथील गावे लॉकडाउन करण्यात आली आहेत. काही प्रमाणात निर्बंधही लादले आहेत. पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, पाथर्डी, आणि शेवगावमध्ये वाढत्या रूग्णसंख्येमुळे हे तालुके हॉटस्पॉट ठरले आहेत. Corona hotspots in five talukas of Nagar district

रूग्णसंख्या वाढत असली तरी लग्न समारंभ, वर्षश्राद्धासारखे समारंभ सुरू आहेत. शेवगावमध्ये एका लग्नात मोठ्या प्रमाणात वऱ्हाडी सापडल्याने प्रशासनाने ते मंगल कार्यालय सील केले आहे. वधू-वरासह सातजणांवर गुन्हा दाखल झालाय.

लॉकडाउन उठल्यापासून कोणालाच धरबंद राहिलेला नाही. कोणीच कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाही. नगर जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला. नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासही त्यांनी बजावले आहे.

त्यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन गतिमान झाले आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी हॉटस्पॉट ठरलेल्या तालुक्यांचा दौरा सुरू केला आहे. जिल्हाधिकारी भोसले यांनी पारनेर तसेच संगमनेर तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. आज जिल्ह्यात ९१८ रूग्ण बाधित आढळून आले. Corona hotspots in five talukas of Nagar district

आजचा आकडा हजार

सर्वाधिक १०९ संगमनेर, पारनेर आणि कर्जतमध्ये प्रत्येकी १०२ रूग्ण आढळले आहेत. शेवगाव - ९३, जामखेड - ६७, श्रीगोंदा - ६३, नगर ग्रामीण - ४७ असे आजचे आकडे आहेत. इतर तालुक्यातही प्रमाण लक्षणीय आहे. नगर शहरात आजच्या दिवशी केवळ २४ रूग्ण आढळले.

संगमनेर, पारनेरमध्ये का वाढताहेत रूग्ण

संगमनेर आणि पारनेर ही दोन्ही तालुके पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेजवळ आहेत. त्या गावांचा पुणे जिल्ह्यासोबत संपर्क आहे. नाशिकमधूनही ये-जा होत असते. पारनेरमधील ४३ आणि संगमनेर २० गावांत लॉकडाउन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी भोसले यांनीही टाळेबंदीचे आवाहन केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi News | गर्दी गोंधळ आणि एकच राडा! राहुल गांधींच्या 'त्या' सभेत काय घडलं?

Farooq Abdullah: मोठी बातमी! फारुख अब्दुल्ला यांच्या सभेत चाकूहल्ला

Hair Removal Creams: शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी हेअर रिमूव्हल क्रीम वापरताय?

Today's Marathi News Live: अवकाळी पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली

Pune Hit and Run Case | सकाळी अटक दुपारी जामीन! पुणे हिट अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT