Corona: दसरा, दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता- राजेश टोपेंनी दिला इशारा Saam Tv
महाराष्ट्र

Corona: दसरा, दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता- राजेश टोपेंनी दिला इशारा

राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या सध्या कमी होताना दिसत येत असली, तरी कोरोनाचे संकट हे काही संपले नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या सध्या कमी होताना दिसत येत असली, तरी कोरोनाचे संकट हे काही संपले नाही. याची काळजी आपण बाळगली पाहिजे. कारण राज्यामध्ये दसरा, दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी दिला आहे.

राज्यामध्ये घटस्थापनेच्या मुहूर्तावर कालपासून सर्व मंदिरे सुरू करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात जाऊन अंबेमातेचं दर्शन घेतले आहे. यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना एका नव्या मोहिमेची त्यांनी घोषणा केली आहे. राज्यामध्ये ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत 'मिशन कवच कुंडल' Mission Kavach Kundal ही मोहिम राबवण्यात येणार आहे.

हे देखील पहा-

यामध्ये १५ ऑक्टोबरपर्यंत वेगाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. राज्यामध्ये कुठेही लस कमी पडणार नाही अशी काळजी या काळात घेतली जाणार आहे, असा विश्वास टोपे यांनी यावेळी व्यक्त केले आहे. राज्यात आजपासून रोज १५ लाख लसीकरण करण्यात येणार आहे आणि याकरिता आपल्याकडे सध्या १ कोटी लसी उपलब्ध आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. दसरा Dussehra आणि दिवाळीनंतर Diwali तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येणार नाही.

या पार्श्वभूमीवर आपण विशेष लसीकरण मोहीम राबवणार आहोत. जेणेकरुन आरोग्यावर गंभीर परिणाम होणार नाही. कारण लसीकरण हा एकमेव मोठा पर्याय आपल्याकडे राहणार आहे, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. मुस्लिम बांधव आता बऱ्यापैकी लसीकरण करुन घेत आहेत. मात्र, मालेगावसारख्या ठिकाणी अद्याप लसीकरण पाहिजे तसे झाले नाही. त्याठिकाणी धर्मगुरू, मौलवी आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य घेऊन लसीकरण केले जाणार असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT