Parth Pawar: मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कार्यालयावरती आयकर विभागाने छापा टाकल्याची धक्कादायक माहिती
Parth Pawar: मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा
Parth Pawar: मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा Saam Tv

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कार्यालयावरती आयकर विभागाने छापा टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे काल सकाळपासून आयकर विभागाच्या रडारवरती अजित पवार यांचे नातलग आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबई मधील नरिमन पॉईंट या ठिकाणी असलेल्या कार्यालयावर धाड टाकण्यात आली आहे.

या अगोदर देखील आयकर विभागाने अजित पवार यांच्या ३ बहिणींच्या घरावर देखील धाड टाकण्यात आली होती. यापैकी १ बहीण ही कोल्हापूर तर इतर २ बहिणीही पुण्यात राहण्यास आहेत. यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावर देखील आयकर विभागाने धाड टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. कोल्हापुर मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणीच्या कार्यालयावर आयकर विभागाने गुरुवारी धाड टाकली होती.

हे देखील पहा-

पवार यांच्या बहिण विजया पाटील यांची पब्लिशिंग कंपनी आहे. त्या राजकारणाशी संबंधित नाहीत. आणि त्यांची कोणतीही कंपनी नाही. पब्लिशिंग कंपनी असलं तरी देखील त्याची उलाढाल ही मर्यादित आहे. विजया पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोठ्या बहिण आहेत. पवार यांच्या अनेक निवडणुक मध्ये योग्य यंत्रणा राबवण्यात पुढे आहे.

एका माध्यम समूहातून सरव्यवस्थापक पदावरून बाजूला झाल्यावर त्या या पब्लिशिंग कंपनीचे काम बघत आहेत. गुरुवारी सकाळच्या सुमारास आयकरच्या ६ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची तपासणीला सुरवात केली होती. परंतु, त्याबद्दल अधिकृत दुजोरा त्यांना मिळाला नाही. विजया पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असता त्यांचा फोन देखील बंद होता.

Parth Pawar: मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा
मागच्या सरकारने गाजर वाटपाचा कार्यक्रम केला मात्र आम्ही चावी वाटपाचा करतोय; आदित्य ठाकरेंची फडणवीस सरकावर टीका

सातारा जिल्ह्यात असलेल्या जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री पवार यांनीच घेतल्याचे तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आली आहे. त्याची चौकशी करताना आयकर विभागाने त्यांच्या कोल्हापुर आणि पुण्यातील बहिणीच्या घरी धाड टाकली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने धाडसत्र करण्यास सुरुवात केली आहे.तसेच काही साखर कारखान्यांवर देखील छापा टाकण्यात आला आहे. हे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचे सांगितले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com