मागच्या सरकारने गाजर वाटपाचा कार्यक्रम केला मात्र आम्ही चावी वाटपाचा करतोय; आदित्य ठाकरेंची फडणवीस सरकावर टीका

शिवसेनेचा आवाज कोणी दाबू शकत नाही.
आदित्य ठाकरेंची फडणवीस सरकावर टीका
आदित्य ठाकरेंची फडणवीस सरकावर टीकाSaamTV
Published On

मुंबई : विक्रोळीच्या Vikroli संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या 411 कुटुंबियांना नवीन घरांच्या चाव्या आज देण्यात आल्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे Aditya Thackeray आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत MP Sanjay Raut यांच्या हस्ते या चावी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पर्यावरण आदित्य ठाकरेंनी मागील पाच वर्ष महाराष्ट्राचा कार्यकाळ संभाळणाऱ्या फडणवीस सरकारवरती Fadnavis Goverment जोरदार टीका केली आहे मागच्या सरकारने गाजरे वाटपाचा कार्यक्रम केला मात्र आपण चावी वाटपाचा कार्यक्रम करत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.(Aditya Thackeray criticizes Fadnavis government)

हे देखील पहा -

तसेच देशात असे कितीही मोठे मोठे फटाके वाजत असतील तरीही शिवसेनेचा Shivsena आवाज कोणी दाबू शकत नाही. देशातलं पण वातावरण बदलायचा आहे राजकीय वातावरण बदलाच आहे. इतर पक्ष चावी मारण्याचं काम करत असतं आपण चावी वाटण्याचे काम करत आहोत शिवाय शब्द दिलेला असतो तो पाळायचा असतो शब्दाचा वाटप होऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी पुन्हा भाजपला चिमटा काढला आहे.

आदित्य ठाकरेंची फडणवीस सरकावर टीका
ED,CBI इन्कम टॅक्स, हे भाजप चे कार्यलय बनलं असल्याचं जयंत पाटलांच वक्तव्यं !

शिवसेनेचा स्वबळाचा नारा -

येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये Mumbai Municipal Corporation Election फक्त आणि फक्त स्वबळावरच सत्ता आणायची आणि ती येणारच असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आपली वेगळी चूल मांडणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com