Cordelia Cruise Drug Case Updates saam tv
महाराष्ट्र

Cordelia Cruise Case: बहुचर्चित कॉर्डेलिया क्रुझवर आले होते एनसीबीनेच जप्त केलेले अमली पदार्थ? हायकोर्टात याचिका दाखल

Cordelia Cruise Drug Case: आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात यासंदर्भात एक याचिकाही दाखल केली आहे.

Chandrakant Jagtap

>> सचिन गाड, साम टीव्ही

Cordelia Cruise Drug Case Updates: बहुचर्चित कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. आता या प्रकणात त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कॉर्डिलिया क्रुझवरून जप्त करण्यात आलेले आमली पदार्थ एनसीबीनेच नेले होते का असा प्रश्ना आता उपस्थीत केला जात आहे. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात यासंदर्भात एक याचिकाही दाखल केली आहे.

तिरोडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत बलार्ड पीअर दंडाधिकारी कोर्टातील एका न्याय दंडाधिकाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात आपलीही साक्ष नोंदवा अशी मागणी याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी केली आहे. सीबीआयकडे तक्रार देऊनही ते दाद देत नसल्याने तिरोडकर यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

या बहुचर्चित प्रकरणात कॉर्डिलिया क्रुझवरून बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यावेळी कॉर्डिलिया क्रुझवर एक न्याय दंडाधिकारीही उपस्थित होते. ते नशेत चूर होते. त्यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुप्तपणे बाहेर काढले असा खळबळजनक दावा या याचिकेत करण्यात आला आहे. (Breaking News)

एवढंच नाही तर हे दंडाधिकारी तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या मुद्देमालावराच म्हणजेच जप्त केलेल्या अमलीपदार्थांवर डल्ला मारून त्याचं स्वत:ही सेवन करत असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच हे दंडाधिकारी त्यांचे मित्र तसेच बॉलिवूडमधील आपल्या मित्रांमध्येही अंमली पदार्थ वाटत असल्याचा गंभीर आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. (Latest Political News)

याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती डॉ नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे प्राथमिक सुनावणी झाली. खंडपीठाने याबाबत सीबीआयकडे विचारणा केली असता तपासयंत्रणेच्या वतीने वकील हितेन वेणेगावकर यांनी या याचिकेच्या वैधतेवर सवाल उपस्थित करत याचिकाकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्राची मागणी केली आहे. या याचिकेवरील सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली असू सीबीआयला या प्रकरणात लक्ष घालण्याचे तोंडी निर्देश देण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT