maharashtra copy case  Saam tv
महाराष्ट्र

राज्यात १२ वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीचा सुळसुळाट, कुठे कुठे घडले गैरप्रकार?

maharashtra copy case : राज्यात १२ वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीचा सुळसुळाट पाहायला मिळाला. काही ठिकाणी कॉलेजच्या खिडकीत येऊन विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत होते.

Vishal Gangurde

१२ वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झालीये

राज्यात पहिल्याच दिवशी ४२ कॉपीचे गैरप्रकार नोंद

पुणे विभागात सर्वाधिक कॉपीचे प्रकरणे आढळलेत

सागर आव्हाड, साम टीव्ही

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात येत आहेत. मंडळाकडून इयत्ता 12 वीच्या प्रमाणपत्र लेखी परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यभरात एकूण ४२ कॉपीचे गैरप्रकारची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे.

विभागनिहाय आकडेवारी पाहता, पुणे विभागात सर्वाधिक २० प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. अमरावती विभागात १२, नाशिकमध्ये ४, नागपूरमध्ये १, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३ आणि लातूर विभागात २ प्रकरणे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागात एकही गैरमार्ग प्रकरण नोंदलेले नाही.

मंडळाकडून परीक्षेदरम्यान कडक उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या. केंद्र संचालक, पर्यवेक्षक, भरारी पथके तसेच व्हिडीओ निरीक्षण यंत्रणेमुळे परीक्षेतील गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात काही ठिकाणी यश आले पण काही ठिकाणी नाही.

बीडमध्ये परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुळाट

बीड तालुक्यातील चौसाळा येथील आर्ट्स अँड सायन्स या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपीचा सुळसुळाट असल्याचे दिसून आलं. तरुण मंडळी नातेवाईकांना कॉपी पुरवण्यासाठी कॉलेजच्या बाहेर एकच गर्दी केली होती. एका दृश्यांमध्ये परीक्षा केंद्राच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात काही तरुण कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कॉपी देत असल्याचे दिसत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 Fruits For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी 7 फळे फायदेशीर, पण खाण्यापूर्वी ही माहिती वाचा

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Astro Tips : या ६ सहा राशींच्या नशीबात असतो राजयोग, कायम असते लक्ष्मीची कृपा

Skin Care: तिशीतही त्वचा दिसेल यंग! घरच्या घरी तयार करा 'या' क्रीम मिळेल नॅचरल ग्लो आणि मॉइश्चर

Kidney Health : रात्रीच्या 'या' ६ सवयी तुमच्या किडनीचा घात करतात, दुर्लक्ष केल्यास डायलिसिसची वेळ येईल

SCROLL FOR NEXT