Walmik Karad News SaamTv
महाराष्ट्र

Beed Case: वाल्मिक कराडला VVIP ट्रिटमेंट, देशमुख कुटुंबाने मागविले CCTV फुटेज

Deshmukh Family Demands CCTV Footage: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड जिल्हा कारागृहात असलेल्या वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ होणार?

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप करण्यात येत होता. याच पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबाच्या सदस्यांनी कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकाराखाली सीसीटीव्ही फुटेज मागविले आहेत. तसेच माहितीचा अधिकार देखील ते आज जिल्हा कारागृहाध्यक्ष यांच्याकडे देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हा कारागृहामध्ये वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. वाल्मिक कराडसह इतर आरोपींना देखील सुविधा पुरविल्या जात आहेत. त्याचबरोबर नियमबाह्य सुविधा देखील पुरवल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांनी आणि लोकप्रतिनिधींनी केला आहे.

या सर्व प्रकाराविषयी आता कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागितले जाणार असल्याचं देशमुख कुटुंबाच्या सदस्यांनी सांगितलं. व्हिआयपी ट्रिटमेंटऐवजी देशमुख कुटुंबाच्या सदस्यांनी तेथील कर्मचाऱ्यांवर देखील आरोप केले आहेत. ड्युटी नसतानाही काही कर्माचारी जिल्हा कारागृहामध्ये येतात आणि हस्तक्षेप करतात. असा देखील आरोप एका पत्रामध्ये संतोष देशमुख यांचे नातेवाईक दादा खिंडकर यांनी केला आहे.

बीड जिल्हा कारागृहात ज्या दिवशी आरोपींची रवानगी करण्यात आली. त्या दिवसापासूनचा सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी, माहितीचा अधिकार जिल्हा कारागृहाधिक्षकांकडे दादा खिंडकर देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT