Crime News: भररस्त्यात नवऱ्याचा रागाचा पारा चढला, बायकोच्या नाकाचा लचका तोडला

Man Bites Wife Nose During Public Dispute: महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत पती आणि पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. याच भांडणातून पतीने पत्नीचे दातांनी नाक चावले आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Married Couple
CrimeSaam Tv News
Published On

महाशिवरात्रीनिमित्त एक धक्कादायक घटना घडली आहे. महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत पती आणि पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. याच भांडणातून पतीने पत्नीचे दातांनी नाक चावले आहे. यामुळे ती रक्तबंबाळ झाली. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी कैसरगंज पोलिस ठाण्याच्या देवलखा चौकात घडली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महाशिवरात्री उत्सवानिमित्त गावातील देवळखा चौकातून शिव मिरवणूक निघाली होती. ही मिरवणूक बुधवारी निघाली होती. यादरम्यान चौकात प्रचंड गर्दी जमली होती. पती पत्नी आणि त्यांची मुले मिरवणुकीत गेले होते. मुलं गर्दीत गेली. त्यानंतर मुलांना बोलावण्यासाठी त्यांची आई पाठोपाठ गेली.

Married Couple
Crime News: वडिलोपार्जित शेतीवरून वाद, मुलाच्या डोक्यात सैतान शिरला, आईचा घेतला जीव

याच गोष्टीचा मनात राग धरून पती आणि पत्नीमध्ये भांडण झालं. पतीला राग अनावर झाला. त्याने थेट पत्नीच्या नाकाचा चावा दातांनी घेतला. त्याने भररस्त्यात जोरात नाकाचा चावा घेतला. यामुळे ती रक्तबंबाळ झाली. नाकातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या.

Married Couple
Maharashtra Politics: योगेश कदमांनी केलेल्या विधानावरून प्रकाश आंबेडकर संतापले, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

महिलेचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर, तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी धाव घेतली. त्यांनी पती पत्नीमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. नंतर महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात पाठवले. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत कैसरगंजचे एसएचओ हरेंद्र मिश्रा म्हणाले की, महिलेच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com