Kalyan Crime News Saam TV
महाराष्ट्र

Kalyan Crime News: इन्स्टाग्रामवरील कमेंटवरून वाद, अल्पवयीन मुलाला अर्धनग्न करून मारहाण; जमिनीवर नाक घासायला लावलं

Kalyan Crime News: एक गटाच्या आराध्य देवीविषयी आक्षेपार्ह पोस्टला कमेंट करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करुन जमीनीवर नाक घासण्यास लावल्याची धक्कादायक घटना कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली

साम टिव्ही ब्युरो

Kalyan Crime News: एक गटाच्या आराध्य देवीविषयी आक्षेपार्ह पोस्टला कमेंट करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करुन जमीनीवर नाक घासण्यास लावल्याची धक्कादायक घटना कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. (Breaking Marathi News)

कायदा हातात घेत एका अल्पवयीन तरुणासोबत असे कृत्य केल्याबद्दल कल्याणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरीकाना कोणीही कोणाबद्दल आक्षेपार्ह विधान करु नये. अफवांवर विश्वास ठेवून नये. आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केलं आहे.

काही दिवसापासून कल्याणमध्ये (Kalyan Crime) आणि आजूबाजूच्या परिसरात इंस्टाग्रामवर जोरदार वाद सुरु आहे. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने जो डिलिवरी बॉय म्हमून काम करतो.

त्याने एका समाजाच्या देवस्थानाविषयी अज्ञातकडून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट केले होते. दुसऱ्या गटाने या तरुणाचा शेाध घेतला. त्याला शोधून काढले. त्याला आधी मारहाण केली. त्याला अर्धनग्न करुन जमिनीवर नाक घासण्यास भाग पाडले.

या संतापजनक घटनेचा व्हिडियो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पोलिसांनी (Police) तातडीने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन तरुणाच्या तक्रारीनुसार त्याला मारहाण करणारे आणि जमीनीवर नाक घासण्यास भाग पाडणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इतकेच नव्हे तर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या दुसऱ्या गटाच्या विरोधातही उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात याआधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

SCROLL FOR NEXT