धुळ्यात मालनगाव धरणाच्या पाण्यावरून वादाची ठिणगी! भूषण अहिरे
महाराष्ट्र

धुळ्यात मालनगाव धरणाच्या पाण्यावरून वादाची ठिणगी!

मालगाव मध्यम प्रकल्पाचे पाणी साक्री शहराला देण्यास 'मालनगाव धरण बचाव संघर्ष समिती' च्या वतीने साक्रीकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील मालनगाव या धरणामध्ये असलेले पाणी साक्रीकरांना देण्यास स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. साक्री तालुक्यातील मालगाव मध्यम प्रकल्प हा या परिसरातील महत्वाचा मानला जाणारा प्रकल्प आहे.याच प्रकल्पातील पाणी साक्री शहराला देण्यास मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज मालगाव प्रकल्पावर जाऊन प्रशासनाच्या निर्णया विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

साक्रीकरांना अक्कलपाडा प्रकल्प हा जवळ असून मालनगाव प्रकल्प हा साक्री पासून बऱ्याच अंतरावर आहे आणि त्यामुळे अक्कलपाडा धरणातूनच साक्रीकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

यावेळी पाण्यात उतरून आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध करीत प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील केली आहे. यावेळी तहसील अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी पोहचून आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचबरोबर यासंदर्भात आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेता पुढील काही दिवसांमध्ये योग्य तो निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात येणार असल्याचे आश्वासन देखील आंदोलकांना देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update अमरावतीत 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच आई...; ठाण्यातील खळबळजनक घटना|VIDEO

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

MNS : मराठी असूनही ते एका मराठी मुलीलाच टार्गेट करत आहेत, मनसे नेत्याच्या मुलाकडून शिवीगाळ; इन्फ्लूएन्सरने सांगितली आपबिती

Blood Pressure: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी वरदान ठरेल 'ही' एक गोष्ट

SCROLL FOR NEXT