Marathi language dispute Saam tv
महाराष्ट्र

जैन मुनीच पेटवतायेत मराठी-मारवाडी वाद? ताराराणींबद्दलच्या वक्तव्याचे राज्यातही पडसाद

Marathi language dispute : जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या मराठी भाषा आणि महाराणी ताराराणींबाबतच्या वक्तव्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणामुळे मराठी अस्मिता, इतिहास आणि धार्मिक वक्तव्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Bharat Mohalkar

ज्ञानेश्वरीचा संदर्भ देत मराठीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या मुद्द्यावरुन जैन मुनीच आमने-सामने आलेत. जैन मुनी नयन पद्मसागर यांनी मराठीबद्दल कोणतं वक्तव्य केलं होतं ? आणि त्यावरुन कसा वाद पेटलाय...? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

आधी मुंबई, त्यानंतर महाराणी ताराबाई आणि आता जैन मुनी नयन पद्मसागर यांनी थेट मराठी अस्मितेलाच हात घातलाय..... संत ज्ञानेश्वरांचं नाव घेत मराठीची रचना ही जैन आचार्यांनी केल्याचं वादग्रस्त वक्तव्य करत जैन मुनी नयन पद्मसागर यांनी मराठीवरच दावा सांगितलाय.. मात्र आता याच वक्तव्यावरुन जैन मुनींमध्ये फूट पडलीय.. नयन पद्मसागर हा मराठी आणि मारवाडी वाद निर्माण करत असल्याचा आरोपच जैन मुनी निलेशचंद्र यांनी केलाय..

दुसरीकडे अभ्यासकांनी जैन मुनी नयन पद्मसागर यांचा दावा फेटाळून लावलाय...

या जैन मुनीने फक्त मराठीवरच दावा सांगितला नाही तर स्वराज्यरक्षिका महाराणी ताराबाई या जैन असल्याचं सांगत जैन मुनी नयन पद्मसागर यांनी थेट इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केलाय... त्याचा संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतलाय..

खरं तर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुंबईतून मारवाडी आणि जैनांचा पैसा काढला तर मुंबई देशाची आर्थिक राजधानीच राहणार नाही, असं म्हणत महाराष्ट्रातील नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळलं...एवढंच नाही तर अनेकदा मांसाहाराचं कारण देत जैन समाजाकडून मराठी भुमिपुत्रांनाच घरं नाकारल्याचं दिसून आलंय.. त्यामुळे आधी मुंबईवर दावा, त्यानंतर खाण्यापिण्यावरुन भेदभाव आणि आता चक्कं मराठी इतिहासाची मोडतोड करत सातत्यानं मराठी माणसांना डिवचण्याचा डाव या मुनींनी आखलाय का असा प्रश्न निर्माण झालाय .

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT