Beed Crime: कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे कंटेनर पोलिसांनी पकडले Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे कंटेनर पोलिसांनी पकडले

35 बैलांसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त...

विनोद जिरे

बीड: परराज्यामध्ये बेकायदेशीररित्या (lawless) कत्तलीसाठी (Slaughter) जनावरांना घेऊन जाणारा कंटेनर, सहाय्यक पोलीस (Police) अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने बीडमध्ये (Beed) पकडला आहे. बीडच्या नेकनूर (Neknur) परिसरातून जनावरे (Animals) घेत, कंटेनर क्र.केए- 51 एएफ- 9009 यामध्ये तामिळनाडूला (Tamil Nadu) बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी घेऊन जात असताना, बीड- अंबाजोगाई मार्गवरील मस्साजोग परिसरात हा कंटेनर पकडण्यात आला आहे.

हे देखील पहा-

यामध्ये कत्तलीसाठी नेण्यात येणारे तब्बल 35 बैल (Bull) आढळून आले आहेत. तर या जनावरांसह कंटेनर (Container) असा 39 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी (Police) जप्त केला आहे. दरम्यान याप्रकरणी बीडच्या केज (kej) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या कारवाईने (action) जनावरांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी वाहनामध्ये जनावरे कोंबून ठेवण्यात आली होती. एक कंटेनर नेकनूर परिसरात आणुन उभे करण्यात आले आहे. यात 35 जनांवरे होती. यावेळी कंटेनर क्र.केए- 51 एएफ- 9009 चा चालकही देखील पकडण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा एक थेंबही न घालता बनवा कुरकुरीत 'खेकडा भजी', चव एवढी भारी की न खाणारेही खातील

Maharashtra News Live Update: यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर

Mumbai : बोगस DCP ला करायचा मदत, मुंबईत PSI ला बेड्या, चोर-पोलिसाचं बिंग असं फुटले

Crime: सून- सासऱ्याच्या अफेअरने संपूर्ण कुटुंबाचा शेवट, नवऱ्याने स्वत: विष पित बायकोला दिलं; नंतर वडील अन् भावाचा मृतदेह आढळला

NEET Paper Leak : पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम मोदींची घोषणा

SCROLL FOR NEXT