Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil Statement: मुख्यमंत्रीपदाची चर्चा माझी बदनामी करण्याचे षडयंत्र; विखे पाटील यांचे स्पष्टीकरण

Radhakrishna Vikhe Patil : "वावड्या पसरविण्‍याचे काम काही मंडळी करीत असून माझी बदनामी करण्‍याचा हेतू"

Shivani Tichkule

सचिन बनसोडे

Shirdi News : समाज माध्‍यमांमधून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी बातमी व्हायरल होत आहे. सुप्रिम कोर्टात एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईवर शिक्कामोर्तब होणार असून त्यापूर्वीच एकनाथ शिंदे राजीनामा देतील आणि विखे पाटील राज्याचे मुख्यमंत्री होतील अशा वावड्या उठवल्या जात आहेत. यासंदर्भात स्वतः विखे पाटलांनी स्पष्टीकरण देत, हे माझ्या बदनामीचे षडयंत्र असल्याचं म्हंटल आहे.  (Latest Marathi News)

व्हायरल बातमी संदर्भात बोलताना विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) पुढे म्हणाले की, माझ्या संदर्भात पसरविले जात असणारे वृत्‍त हे कपोलकल्‍पीत आणि मला बदनाम करण्‍याचे षडयंत्र आहे.अशा वावड्या पसरविण्‍याचे काम काही मंडळी करीत असून माझी बदनामी करण्‍याचा हेतू आहे.

या वृतांमध्ये कोणतेही तथ्‍य नाही. राज्‍याला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांच्‍या माध्‍यमातून सक्षम नेतृत्‍व मिळाले आहे. राज्‍याचा निर्णय हा प्रधानमंत्र्याच्‍या स्‍तरावर झाला असल्‍याने यामध्‍ये कुठलीही विसंगती असण्‍याचे कारण नाही असे स्‍पष्‍ट मत महसूलमंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : 'मोहब्बत हो गई...'; गाण्यावर शिवाली परब बेभान होऊन नाचली, पाहा VIDEO

Ratnagiri : चिपळूणमध्ये भयंकर अपघात, पावसात थारने रिक्षाला उडवले, ५ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra Rain Live News: मेहेकर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

कोसळधार! राज्यात पावसाचे ७ बळी; मराठवाड्यात ११ जण बेपत्ता, कुठे कशी परिस्थिती?

Pune Monsoon Update : पुण्याला आज रेड अलर्ट, मुसळधार पावसाने झोडपले, पुणेकराच्या पाण्याचे टेन्शनही संपवले

SCROLL FOR NEXT