Nagpur Crime News: नात्याला काळीमा! हुंड्यासाठी नवऱ्याकडून ब्लॅकमेलिंग, बायकोचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ तयार करुन...

Latest Crime News: हुंड्यासाठी नवऱ्याने बायकोचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ तयार करत पैशांची मागणी केली आहे.
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam Tv
Published On

Nagpur News: हुंड्यासाठी (Dowry Case)) अजूनही राज्यातील अनेक महिलांचा नवरा आणि सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. अशामध्ये नागपूरमध्ये (Nagpur) देखील अशीच घटना घडली आहे.

हुंड्यासाठी नवऱ्याने बायकोचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ तयार करत पैशांची मागणी केली आहे. या प्रकरणी आरोपी नवऱ्याविरोधात नागपूरच्या मानकापूर पोलिस (Nagpur Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur Crime News
Jalna Accident News : भरधाव कार थेट जायकवाडीच्या कालव्यात कोसळली; आडत व्यापाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या मानकापूरमध्ये राहणारा व्यक्ती हुंड्यासाठी चक्क खालच्या थराला गेला. त्याने आपल्या बायकोचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ तयार करुन हुंड्यासाठी तिचा छळ सुरु केला. या व्हिडिओच्या माध्यमातून तो बायकोला माहेरवरुन 10 लाख रुपये आणण्यासाठी जबरदस्ती करु लागला. जर पैसे आणले नाही तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देऊ लागला. यासाठी त्याचे आई-वडील देखील साथ देत होते. या प्रकरणी पीडित महिलेने सासरच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

Nagpur Crime News
Solapur News: अल्पवयीन मुलीनं बाळाला जन्म दिला; पतीसह सासू, सासरा आणि आई-वडीलांवर गुन्हा दाखल

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन मानकापूर पोलिसांनी महिलेच्या नवरा, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. या महिलेने तक्रारीमध्ये पोलिसांना सांगितले की, 2008 मध्ये तिचा पहिला विवाह झाला होता. पहिल्या पतीपासून तिला दोन अपत्य आहे. पण पहिला पती त्रास देत असल्याने ती त्याच्यापासून वेगळी झाली. त्यानंतर 2019 मध्ये एका विवाह संकेत स्थळांवरुन ओळख होत तिने वाशीम येथील तरुणासोबत चार लाख रुपयांचे दागिणे देत दुसरं लग्न केलं.'

'पण लग्नानंतर तिचा पती 10 लाख रुपयांची मागणी करु लागला. पैसे देत नसल्याने त्याने छळ सुरू केला. याच दरम्यान तिचा गर्भपात झाला. त्यामुळे ती माहेरी गेली. त्यानंतर तिची समजूत काढत तिला परत सासरी आणण्यात आले. पतीने हुंड्यासाठी खालच्या थराला जाऊन अंघोळ करताना तिचा व्हिडीओ काढला. 10 लाख रुपये दे नाही तर सोशल मीडियावर व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची तो धमकी देऊ लागला.'

सासरच्या मंडळींकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिने नवरा, सासू आणि सासऱ्यांविरोधात छळ करत असल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com