Jalna Accident News : भरधाव कार थेट जायकवाडीच्या कालव्यात कोसळली; आडत व्यापाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

Jalna Accident News : अंबड तालुक्यातील तीर्थपुरीजवळ जायकवाडीच्या डाव्या कालव्यात कार कोसळून आडत व्यापार्‍याच्या दुर्देवी मृत्यू झाला आहे.
Jalna Accident News
Jalna Accident NewsSaam TV
Published On

Jalna Accident News : जालना जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील तीर्थपुरीजवळ जायकवाडीच्या डाव्या कालव्यात कार कोसळून आडत व्यापार्‍याच्या दुर्देवी मृत्यू झाला आहे. नंदू सोनाजी राजगुरू असं मृत्युमुखी पडलेल्या आडत व्यापाऱ्यांचे नाव असून ते अंबड तालुक्यातील रुई गावचे रहिवाशी आहे. (Latest Marathi News)

Jalna Accident News
NCP National Party status : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द का झाला? जाणून घ्या सविस्तर...

मिळालेल्या माहितीनुसार, तीर्थपुरी (Jalna News) येथील बाजार समितीच्या यार्डात कापूस व भुसार माल खरेदी-विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. आज ते रुई गावातून दुपारी १ वाजेच्या सुमारास भार्डी मार्गे तीर्थपुरीकडे येत होते. भार्डी गावाजवळ असलेल्या अचानकनगर या ठिकाणाहून वाहणाऱ्या जायकवाडीच्या डाव्या काळव्याजवळ त्यांचं कार वरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार डाव्या कालव्यात (Accident) जाऊन कोसळली.

या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना (Police) दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कार कालव्याच्या बाहेर काढली. मात्र, तोपर्यंत नंदू राजगुरू यांचा मृत्यु झाला होता. दरम्यान, नंदू राजगुरू यांच्या आडत दुकानात तीर्थपुरी व परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी शेकडो क्विंटल सोयाबीन आगाऊ जमा करून ठेवलेले आहेत.

जेव्हा भाव वाढेल त्यावेळेस सोयाबीनचे पैसे देण्याच्या अटीवर ही सोयाबीन नंदू यांनी शेतकऱ्याकडून खरेदी करून ठेवल्याची माहिती ही समोर येत आहे. त्यातच राजगुरू यांच्याकडे अनेक लोकांचे हातउसने पैसे ही असल्याची माहिती समोर येत आहे.

Jalna Accident News
Google Pay Cashback : 'गुगल पे'ची एक चूक अन् युजर्स मालामाल; अनेकांच्या खात्यात जमा झाले पैसे, तुम्हाला मिळाले?

त्यामुळे सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राजगुरू यांच्याकडे लाखो रुपयांची देणी असल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हा अपघात की आत्महत्या अशा विविध चर्चाना परिसरात उधाण आलं आहे. (Breaking Marathi News)

गेल्यावर्षी झालं होतं नंदू राजगुरू यांचं अपहरण

दरम्यान नंदू राजगुरू हे गेल्या एक वर्षांपासून आर्थिक व्यवहारामुळे अडचणीत असल्याची माहिती ही समोर येत असून गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात त्यांचं रुई गावातून अपहरण झाल्याची घटना ही घडली होती. याबाबत त्यांच्या पत्नीकडून गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला होता.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com