H K Patil
H K Patil Saam Tv
महाराष्ट्र

काँग्रेस लोकशाहीने चालणारा पक्ष, भाजपसारखा हुकूमशाही नाही; एच. के. पाटलांचा हल्लाबोल

साम टिव्ही ब्युरो

शिर्डी : काँग्रेस (Congress) पक्ष लोकशाहीला माननारा पक्ष आहे. शिर्डीतील शिबिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी मोकळेपणाने व स्पष्टपणे मते मांडली व ती मते विचारात घेण्यात आली. अशा पद्धतीची लोकशाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे का ? असा सवाल करत, ते फक्त आदेश देण्याचे काम करतात, असा टोला काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी भाजपवर (BJP) लगावला.

शिर्डी येथे गेल्या दोन दिवसापासून काँग्रेसचे नवसंकल्प शिबीर झाले. या शिबीराला राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावली. तर काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

शिबिरात ५१ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, दोन दिवसाच्या या शिबिरात उदयपूर घोषणापत्राची अमंलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून, एक व्यक्ती एक पद नियमानुसार या शिबिरात ५१ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून, ही पक्रिया पुढेही चालूच राहणार आहे. सहा विभागांनी केलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्याचे कामही केले जाणार आहे. सरकार व पक्ष संघटना यांच्यात समन्वय साधणे, संघटन वाढवणे यावरही विस्तृत चर्चा झाली आहे.

केंद्रातील भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून, शेतकरी आंदोलनावेळी शेतकऱ्यांचा नक्षलवादी, दहशतवादी आंदोलनजीवी म्हणून अपमान केला त्याचा निषेधही या शिबिरात करण्यात आला. फडणवीस सरकारने शिवाजी महाराजांच्या नावाने फसवी शेतकरी कर्जमाफी योजना राबवली व शिवाजी महाराजांचाही अवमान केला. महाविकास आघाडी सरकारने मात्र सत्ता येताच दिलेले आश्वासन पूर्ण करत सरसकट कर्जमाफी दिली. जनतेला दिलेला शब्द पाळला. हे सरकार शेतकरी, कामगार, दलित, वंचित समाजाच्या हिताचे रक्षण करणारे सरकार आहे, असंही पटोले (Nana Patole) म्हणाले.

१०० दिवसांचा कार्यक्रम बनवावा लागणार

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की, शिर्डी कार्यशाळेतील दोन दिवसाच्या मंथनातून जे सार निघाले आहे त्याचे एक दिशादर्शक पुस्तक बनू शकते. आता याची अंमलबजाणी करायची आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम बनवावा लागणार आहेत. त्यानंतर त्याचा उपयोग आमागी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निश्चितच होईल. महाराष्ट्र राज्य स्वतंत्र होण्याअगोदर शिर्डीत यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक अधिवेशन पार पडले होते. या अधिवेशनात त्यावेळचे मातब्बर नेते सहभागी झाले होते. हे अधिवेशन काँग्रेससाठी लाभदायी ठरले. तसेच हे अधिवेशनही काँग्रेस पक्षाला फलदायी ठरेल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Fire News: ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या भीषण अचानक आग, कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव; खळबळजनक घटना

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

SCROLL FOR NEXT