महाराष्ट्रावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचं संकट; आजची रुग्णांची आकडेवारी धास्ती वाढवणारी

सलग दुसऱ्या दिवशीही रुग्ण हजारांच्या पुढे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
Maharashtra Latest Corona Update
Maharashtra Latest Corona UpdateSaam Tv
Published On

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचे (Corona) रुग्ण काही महिन्यांपासून कमी झाले होते. पण आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले आहे. राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आज राज्यात कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या पुढं गेली आहे. आज राज्यात १०४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एका कोरोना रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. (Maharashtra Latest Corona Update)

सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर १. ८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०९,७७,९०८ प्रयोगशाळा नमुन्यापैकी ७८,८९,२१२ (०९.७४ टक्के) नमुने कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे रुग्ण हजारांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे राज्य सरकार गंभीर झाले असून, आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टास्क फोर्सची (Task Force) बैठक घेतली. या बैठकीत आतापर्यंतचा आढावा घेण्यात आला.

Maharashtra Latest Corona Update
Corona Updates: निर्बंध नको असतील तर...; मुख्यमंत्र्यांनी दिला 'हा' गंभीर इशारा

राज्यातील रुग्णांची आकडेवारी

मुंबई विभागात- ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल या शहरांचा समावेश आहे. या विभागात ९२० नव्या रुग्णांची (Corona) नोंद झाली आहे.

नाशिक विभागात - यामध्ये नाशिक, नाशिक एमसी, मालेगाव एमसी, अहमदनगर, अहमदनगर एमसी, धुळे, धुळे एमसी, जळगाव, जळगाव एमसी, नंदुरबार यांचा समावेश आहे, या विभागात ७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

पुणे विभागात- यात पुणे, पीएमसी, पीसीएमसी, सोलापूर, सोलापूर एमसी, सातारा यांचा समावेश आहे. या विभागात ८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

कोल्हापूर विभागात- कोल्हापूर, कोल्हापूर एमसी, सांगली, सांगली एमसी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात आज ८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.(Corona Latest News)

Maharashtra Latest Corona Update
महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा मास्टर प्लान, शरद पवारांनी दिल्या 'या' सूचना

औरंगाबाद विभागात- औरंगाबाद, औरंगाबाद एमसी, जालना, हिंगोली, परभणी, परभणी एमसी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

लातूर विभागात- लातूर, लातूर एमसी, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड एमसी, या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात नव्या १ रुग्णाची नोंद झाली आहे.

अकोला विभागात- अकोला, अकोला एमसी, अमरावती, अमरावती एमसी, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे, या विभागात ६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

नागपूर विभागात- नागपूर, नागपूर एमसी, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, चंद्रपूर एमसी, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात १५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com