Maharashtra Politics  Saam Tv
महाराष्ट्र

Congress: काँग्रेसला मोठं खिंडार! बड्या नेत्याने सोडली साथ; शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

Balasaheb Hinganikar joins BJP in Amravati: अमरावतीमध्ये भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं.

Priya More

Summary -

  • अमरावतीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का

  • काँग्रेसचे नेते बाळासाहेब हिंगणीकर यांनी सोडली काँग्रेसची साथ

  • हिंगणीकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह केला भाजपमध्ये प्रवेश

  • अमरावतीमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतरही राज्यामध्ये भाजपकडून इतर पक्षांना धक्कातंत्र सुरूच आहे. भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रसेच्या बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडली. काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांचा भाजपात प्रवेश केला. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती बाळासाहेब हिंगणीकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशामुळे अमरावतीमध्ये भाजपची ताकद वाढली.

काँग्रेसचे नेते आणि अमरावती जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी यांनी पक्षाला रामराम ठोकला. या सर्वांनी अमरावती येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य पक्षप्रवेश केला. विशेष म्हणजे बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह विविध पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे बाळासाहेब हिंगणीकर यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत हा पक्षप्रवेश केला. अंजनगाव सुर्जी-दर्यापूर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब हिंगणीकर यांचा प्रभाव आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले निलेश पारडे यांनीसुद्धा भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. दर्यापूरच्या स्थानिक अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अकोलामधील काँग्रेस नेत्याने देखील शनिवारी पक्षाची साथ सोडली. काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाची संधी न दिल्यामुळे नाराज असलेल्या रावदेल यांनी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. कपिल रावदेव हे अकोला शहरातील काँग्रेसचे जुने, निष्ठावंत आणि वैचारिक फळीतील प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेसमधला ब्राह्मण समाजातला प्रमुख आणि सुसंस्कृत चेहरा म्हणून कपिल रावदेल यांची संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे. काँग्रेसने सातत्याने डावल्यामुळे पक्ष सोडत असल्याचं रावदेव यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Short Hair Hairstyles: छोट्या केसांसाठी 5 युनिक स्टाईल्स, तुमचा लूक दिसेल एकदम भारी

Maharashtra Live News Update: बोगस शालार्थ आयडी प्रकरणात मोठी अपडेट, SIT च्या पहिल्या अहवालात १५० शिक्षकांची नावे

IND vs NZ Final: वर्ल्डकप फायनलचा थरार! भारत-न्यूझीलंड भिडणार, पाहा 30 सामन्यांचा रेकॉर्ड सांगतो कोणाचं पारडं जड!

Palghar Tourism : मुंबईजवळील फार कमी लोकांना माहित असलेले ऐतिहासिक ठिकाण , 'येथे' मराठ्यांनी घडवलाय इतिहास

Bigg Boss Marathi 6 : अखेर बिग बॉसने घराच्या 'व्हिलन'ला दाखवला बाहेरचा रस्ता; विशालने रुचिताला दिली 'ती' प्रेमाची वस्तू|VIDEO

SCROLL FOR NEXT