Nana Patole  Saam TV
महाराष्ट्र

'गांधी कुटुंबीयांना अडकवण्याचे मोदी सरकारचे षडयंत्र', ईडीच्या कार्यालयात कॉंग्रेसचा मोर्चा धडकणार

विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात आहे - नाना पटोले

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा केंद्र सरकारचे षडयंत्र आहे. राजकीय सूडबुद्धीने गांधी कुटुंबीयांवर आरोप केले जात आहेत. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात आहे, म्हणून खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठीच सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि व राहुल गांधी यांना ईडीने (Enforcement Directorate) नोटीस पाठवली आहे. भाजप सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचा विरोध करण्यासाठी १३ जूनला मुंबई आणि नागपूर येथील ईडीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलीय. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री सहभागी होणार असल्याचेही पटोले म्हणाले आहेत.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार हे लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून काम करत आहे. सीबीआय,ईडी,इन्कम टॅक्स,एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना मोदी सरकारने कळसुत्री बाहुल्या बनवले आहे.विरोधकांना नामोहरण करण्यासाठी त्यांचा गैरवापर केला जात आहे. देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या घरावर धाडी टाकल्या जात आहेत,त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे.काँग्रेस पक्ष सातत्याने भाजपाच्या जुलमी,अत्याचारी व मनमानी कारभाराच्या विरोधात आवाज उठवत आला आहे.

तीन काळे कृषी कायदे,महागाई,बेरोजगारीच्या मुद्यावर भाजपा सरकारला काँग्रेसने रस्त्यावर उतरूनही जाब विचारला आहे.नुकतेच उदयपूर येथे काँग्रेस पक्षाचे नवसंकल्प शिबीर पार पडले. या शिबिरातील काँग्रेस पक्षाचा उत्साह पाहून भाजपाला धडकी भरली आहे. आमच्या नेत्यांवर दबाव आणण्यासाठी खोटे प्रकरण रचून ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे.भाजपा सरकारच्या या कटकारस्थानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष सोमवार १३ जून रोजी ईडीच्या कार्यासमोर धरणे आंदोलन करणार आहे.सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या पाठीशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस खंबीरपणे उभी असून आम्ही मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालणार नाही, असेही पटोले म्हणाले.

मुंबई ईडी कार्यालयोसमोर आंदोलन

मुंबईतील ईडीच्या कार्यालयासमोर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व विधिमंडळ पक्षनेते,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड,आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी,वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख,मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख,गृहराज्यमंत्री सतेज पाटील,राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम,मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप,खा.रजनीताई पाटील,खा.कुमार केतकर,प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील,नसीम खान,प्रणिती शिंदे,महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे,सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे,आ.अमर राजूरकर,प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,जयप्रकाश छाजेड प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार,प्रमोद मोरे,मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

नागपूर येथील ईडी कार्यालयासमोर आंदोलन

नागपूर येथील ईडीच्या कार्यालयासमोर उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, दुग्धविकास मंत्री सुनिल केदार,खा.सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर,माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे,चंद्रकांत हंडोरे, आ.कुणाल पाटील,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tourism Place: मनमोहक दृश्ये अन् सुंदर नजारा; कोकणातील या गावात वाहने नाही तर दारासमोर होड्या केल्या जातात पार्क

IPL 2025 Auction, Players List: 574 खेळाडू लिलावाच्या रिंगणात! या 12 मार्की खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष

Shani Dev: शनिवारी बांधा काळा धागा, शनिदोष होईल दूर

Maharashtra News Live Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज येवला दौऱ्यावर

Gadchiroli News: गडचिरोलीत पोलिसांनी कट उधळला, पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ बॉम्बस्फोट

SCROLL FOR NEXT