नीट परीक्षा घोटाळा (NEET Exam Scam), पेपर फुटी प्रकरण (PaPer Splitting Case), वाढती महागाई (Rising Inflation), शेतकऱ्यांना हमीभाव यासह वेगवेगळ्या मुद्द्यावर महायुती सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेसच्या वतीने राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं (Congress Protest) केली जात आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून चिखल फेक आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी महायुती (Mahayuti) आणि भाजप सरकारविरोधात (BJP Government) जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला आहे.
धुळ्यामध्ये भाजपविरोधात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत. भाजपच्या विरोधामध्ये धुळ्यात काँग्रेसच्या वतीने चिखल फेक आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासन देऊन जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. १५ लाख रुपये नागरिकांच्या खात्यात जमा करण्यासह दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना नोकरी देण्याचं खोट आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणाबाजी करत काँग्रेसच्या वतीने चिखल फेको आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांना हमीभाव, पेपर फुटीप्रकरण, महागाई यासह अनेक विषयांवर महायुती सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत कल्याणमध्ये काँग्रेसने महायुती सरकारविरोधात चिखल फेक आंदोलन केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी महायुती सरकारचा प्रतिकात्मक पुतळा बनवून या पुतळ्यावर चिखल फेक करत महायुती सरकारचा निषेध केला. महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत चिखल फेक आंदोलन करण्यात आले.
नागपूरमध्ये महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे चिखल फेक आंदोलन सुरू आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजी करत आहेत. नीट परीक्षेतील गोंधळ, महागाई, बेरोजगारी, शेतऱ्यांचे प्रश्न, गुन्हेगारी या मुद्द्यांवर काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने चिखल फेक आंदोलन करण्यात आले. दरम्यान नीट परिक्षेतील निकालातील गैरकारभाराची एसआएटी मार्फत चौकशी करावी, विविध परीक्षेतील पेपर फुटी, नीट परिक्षेतील घोटाळा, शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले दुष्काळी अनुदान, वाढती महागाई यासह वेगवेगळ्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सोलापुरात काँग्रेसने महायुती सरकारविरोधात चिखल फेक आंदोलन केले. सोलापुरातील पूनम गेट परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. महायुती सरकारच्या प्रतिकात्मक पोस्टरला चिखल लावून आणि लाथा घालत हे आंदोलन करण्यात आले. नोकरभरती, पेपरफुटी, हमीभाव, जाती धर्मात तेढ या प्रश्नांवर काँग्रेसने हे आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
'राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्टयुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतेय. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. असा आरोप काँग्रेसने अकोल्यात चिखल फेको आंदोलनदरम्यान केलाय. सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून काँग्रेसच्या वतीने चिखल फेको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करण्यात आलाय. अकोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.