Vidhan Sabha Election : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगाने दिले संकेत, पाहा VIDEO

Maharashtra Assembly Election 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाने ४ राज्यांमधील निवडणूक याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना केली जारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024 Saam TV

प्रमोद जगताप, साम टीव्ही

लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चबांधणी सुरु केली असून जागावाटपावरून खलबंत सुरू आहे. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने ४ राज्यांमधील निवडणूक याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना केली जारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग कामाला लागले आहे. यासाठी आज मतदारांच्या याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

घरोघरी जाऊन मतदार याद्या अदययावत करा, अशा सूचना आयोगाने निवडणूक दिल्या आहेत. तसेच मतदान केंद्राच्या अडचणी देखील दूर केल्या जाणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्याआधीच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, असं असलं तरी अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

दरम्यान, सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक घेण्यासाठी बराच वेळ मिळेल. पण हरियाणा विधानसभेची मुदत आधी संपत असल्यामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घेतली जाऊ शकते. २०१९ साली महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाही याच तारखेच्या आसपास मतदान होऊ शकते.

Maharashtra Assembly Election 2024
Laxman Hake VIDEO : ५४ लाख कुणबी नोंदी रद्द करण्याबाबत लेखी द्या, तरच उपोषण मागे; लक्ष्मण हाके मागणीवर ठाम

लोकसभेत मविआचा बोलबाला, विधानसभेत काय होणार?

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली होती. ४८ पैकी तब्बल ३१ जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले. दुसरीकडे महायुतीला फक्त १७ जागांवरच विजय मिळवता आला. तर सांगलीची एक जागा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जिंकली. त्यांनी सुद्धा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महायुतीचा सुपडा साफ करू, असं महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. येत्या ४ महिन्यात राज्यातील सरकार बदलणार, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री बनेल, असं म्हणत सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता.

सध्या महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांची जागावाटपाबाबत बोलणी सुरू आहे. दुसरीकडे लोकसभेतील अपयश विसरून महायुतीचे नेते देखील विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीला लोकसभेत महायुतीपेक्षा केवळ दीड टक्के जास्त मते मिळाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आपण जोर लावला, तर पुन्हा राज्यात सत्तास्थापन करू शकतो. त्यामुळे जोमाने कामाला लागा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024
Manoj Jarange VIDEO : कुणबी नोंदी तातडीने रद्द करा, लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com