CWC List Saam tv
महाराष्ट्र

CWC List: काँग्रेस वर्किंग कमिटीची यादी अखेर जाहीर; महाराष्ट्रातून अशोक चव्हाणांसह हंडोरे यांचीही वर्णी

काँग्रेसने आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी नव्याने कार्यकारिणी जाहीर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Congress Working Committee List: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जय्यत तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी नव्याने कार्यकारिणी जाहीर केली आहे. या काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांचाही सामावेश करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासहित ३९ जणांचा सामावेश आहे. या कमिटीमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांचाही सामावेश आहे. या कमिटीमध्ये अशोक चव्हाण, मुकुल वासनिक यांचा सावमावेश आहे.

तसेच रजनीताई पाटील, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर या महिला नेत्यांचाही सामावेश करण्यात आला आहे. तर चंद्रकांत हंडोरे यांना कायम निमंत्रितांमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

या काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये G-23च्या अनेक नेत्यांचा सामावेश करण्यात आला आहे. यामध्ये आनंद शर्मा आणि शशी थरूर यांनाही स्थान देण्यात आलं आहे. या कमिटीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी अनेक बैठकांचा तगादा लावला होता. या कमिटीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील आहेत.

काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये महाराष्ट्रातून कोणाला स्थान मिळालं?

1. मुकुल वासनिक

2. अशोकराव चव्हाण

3. अविनाश पांडे (महासचिव म्हणून)

4. माणिकराव ठाकरे (प्रभारी)

5. रजनीताई पाटील (प्रभारी)

कायम निमंत्रित :

6.चंद्रकांत हंडोरे

विशेष आमंत्रित :

7.यशोमती ठाकूर

8.प्रणिती शिंदे

दरम्यान, या कमिटीमध्ये खरगे यांच्यानंतर सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे नाव आहे. त्यानंतर राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, एके अँटनी, अंबिका सोनी, मीरा कुमार आणि दिग्विजय सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच या कमिटीमध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना स्थान मिळालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना! धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण खाली पडला

Drishyam 3 OTT : थिएटरनंतर ओटीटीवर रंगणार 'दृश्यम ३'चा थरार, अजय देवगनचा चित्रपट कधी अन् कुठे पाहता येणार?

Maharashtra News Live Update: कॉकरोच जनता पार्टीची २ वाजता आज पत्रकार परिषद

Gold Rate Today: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर वाढले की घसरले? जाणून घ्या आजचे २२ अन् २४ कॅरेटच्या किंमती

Navratri fasting rules: नवरात्रीच्या उपवासात काय खावं आणि काय टाळावं? देवीच्या पूजेपासून आहारापर्यंत प्रत्येक नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT