भंडाऱ्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखविले काळे झेंडे
CM Eknath Shinde In Bhandara Saam Tv
महाराष्ट्र

CM Shinde Video : भंडाऱ्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखविले काळे झेंडे

साम टिव्ही ब्युरो

शुभम देशमुख, साम टीव्ही, भंडारा प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवल्याची घटना घडली आहे. भंडारा येथील 547 कोटींच्या कामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे भंडारा येथे दाखल झाले आहेत. आज वैनगंगा नदीवर भंडारा ते गोसेखुर्दपर्यंत जल पर्यटन निर्मिती होत असून आज या कामातील पहिला टप्पा भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडला.

या कार्यक्रमातनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभामंडपी जात जात होते. याच वेळेस भंडारा शहरातील जिल्हा परिषद येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्री यांच्या निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान, लोकसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विदर्भावर लक्ष केंद्रित केलं आहे. यातच भंडारा येथे 547 कोटी रुपयांचा कांमाचं भूमिपूजन करत विदर्भातील एकट्या भंडाऱ्या जिल्ह्याला मोठा निधी देत आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना मोठा निधी देत मतदारांनाही एक प्रकारे आकर्षित करण्याचा मानस यामधून दिसून येत आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष निवडून आलेले असून त्यांनी शिंदे गटाला समर्थन केलेले आहे.

नरेंद्र भोंडेकर यांनी आजच्या या भूमिपूजन सोहळ्यासोबत कार्यकर्ता मेळाव्यामध्ये एक प्रकारे शक्ती प्रदर्शनही केलं. मुख्यमंत्री यांनी लोकसभेच्या निकालानंतर विदर्भाकडे लक्ष केंद्रित केले असून आगामी विधानसभामध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी तयारी करत आहे. तसेच ज्या जागा भाजपकडे नाही, त्या जागेवर शिवसेनेकडून उमेदवार उतरवता येईल का? याचा आढावाही मुख्यमंत्री शिंदे घेणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : मुंबईत दुसऱ्या सत्रातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Monsoon Driving Tips: मुसळधार पावसात गाडी चालवताना काय काळजी घ्याल?

VIDEO: ठाण्यात लोकलचा खोळंबा, रिक्षा स्थानकावर प्रवाशांची तुंडुंब गर्दी

Raigad Fort Closed: किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद! स्थानिक शाळांना सुट्टी जाहीर; ढगफुटीसदृश्य पावसानंतर प्रशासन अलर्ट

VIDEO: बाळासाहेब थोरातांच्या 'त्या' आरोपावर मुख्यमंत्री Eknath Shinde यांचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT