लोकसभेत जबरदस्त कामगिरी करूनही विधानसभेत पराभव हाती आल्याने काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे संतपाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधातील वक्तव्यांमुळे पक्षाचं नुकसान झालं असल्याचं म्हणत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी नेत्यांवर संताप व्यक्त केलाय. तसेच लोकसभेच्या विजयानंतर तीन महिन्यात असा काय बदल झाला की आपल्याला पराभवाला समोर जावं लागलं, असा खणखणीत सवाल केला.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागलाय. लोकसभा निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड देणारा काँग्रेस पक्षाचा विधानसभेत दारूण पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव कशामुळे याचे विचारमंथन आता पक्षाकडून केलं जात आहे. यासाठी दिल्लीतील काँग्रेस हायकमांड नेत्यांनी बैठक घेतली असून यात राज्यातील नेत्यांची कानउघडणी करण्यात आली.
महाराष्ट्रात २० तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच २३ नोव्हेंबरला मतदानाची मतमोजणी झाली. यात महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीला २०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या. तर एकट्या भाजपचे ११५ आमदार निवडून आले. राज्यात २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला ४६ जागा मिळाल्या तर काँग्रेसच्या ताब्यात फक्त १६ जागा आल्या.
विधानसभेतील दारुण पराभवावरून काँग्रेसच्या नेत्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान लोकसभेत भरघोस जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला विधानसभे का पराभूत व्हावे लागले? याचे कारण शोधले जात आहे. पराजय कशामुळे झाला याचे विचारमंथन पक्षातून केले जात आहे. यासाठी दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींकडून बैठक घेतली जात आहे. आज नवी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्त्वाखाली बैठक झाली. या बैठकीत त्यांनी काँग्रेस नेत्यांची कानउघडणी करत त्यांना चांगलेच फैलावर घेतले.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभेच्या विजयानंतर तीन महिन्यात असा काय बदल झाला की आपल्याला पराभवाला समोर जावं लागलं, असा प्रश्न त्यांनी काँग्रेस नेत्यांना केला. एकमेकांविरोधातील वक्तव्यांमुळे निवडणुकीत पक्षाचं नुकसान झालं. पक्षांतर्गत होत असलेल्या टीकेमुळे काँग्रेसचा पराभव झाला. त्यावरूनही खरगेंनी नाराजी व्यक्त केली.
निवडणुकीच वातावरण अनुकूल असणे ही विजयाची खात्री नाही तर वातावरणाचे निकालात रूपांतर करावे लागेल अस काम करायला हवं होतं. अनेक राज्यांमध्ये पक्ष संघटनेने अपेक्षेप्रमाणे काम केलं नसल्याची सुद्धा खरगे म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.