Congress MLAs will join Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fandavis government Big claim of Buldhana MP Prataprao Jadhav  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसही फुटणार? शिंदे गटाच्या खासदाराचा खळबळजनक दावा

Maharashtra Political News: एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेसमध्येही देखील मोठी फूट पडणार, असा खळबळजनक दावा शिंदे गटातील खासदाराने केला आहे.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही

Maharashtra Political News: एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. या घटनेला वर्षभराचा कालावधील लोटला असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली.  (Latest Marathi News)

या दोन्ही पक्षातील आमदारांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. दरम्यान, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेसमध्येही देखील मोठी फूट पडणार, असा खळबळजनक दावा शिंदे गटातील खासदाराने केला आहे.

विजय वडेट्टीवार यांना विरोधीपक्षनेते केल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, त्यामुळे लवकरच काँग्रेसमधील एक मोठा गट महायुती सरकारमध्ये सामील होणार, असा दावा शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथे माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी तसेच काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. इतकंच नाही, तर विजय वडेट्टीवार यांना विरोधीपक्षनेते केल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, त्यामुळे लवकरच काँग्रेसमधील एक मोठा गट महायुती सरकारमध्ये सामील होणार, असा दावाही प्रतापराव जाधव यांनी केला.

खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव यांनी असा दावा करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी महिनाभरापूर्वी सुद्धा त्यांनी असाच दावा केला होता.

ठाकरे गटातील 2 खासदार आणि तब्बल 8 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा प्रतापराव जाधवांनी केला होता. ते लवकरच शिंदे यांच्या शिवसेना सोबत येतील असे जाधव म्हणाले होते. त्यामुळं आता ठाकरे गटात मोठ खिंडार पडणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. हे खासदार आणि आमदार नेमके कोण? त्यांची नावे सांगणे खासदार प्रतापराव जाधव यांनी जाणीवपूर्वक टाळले होते. आता त्यांनी नवा दावा केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT