congress mla praniti shinde criticizes state and central government  saam tv
महाराष्ट्र

Praniti Shinde: नाकर्ते सरकारवर संक्रात येऊ द्या : आमदार प्रणिती शिंदे

केवळ पैसेसाठी नाही तर त्या मुलांचं भविष्य चांगल व्हावं यासाठी अंगणवाडी सेविका काम करतात असेही आमदार प्रणिती शिंदेंनी नमूद केले.

विश्वभूषण लिमये

Solapur News :

अंगणवाडी सेविकांचा मानधन वाढीचा प्रश्न हा खूप मोठा आहे. तुमचा प्रश्न सुटावा यासाठी अधिवेशनात मी आवाज उठविला. परंतु हे सरकार त्यावर काम करायला तयार नाही. महिला आमदार म्हणून जरी कोणत्याही पक्षाचे असलो तरी आम्ही शांत बसणं म्हणजे पाप आहे. तुम्ही सर्वांनी हिरवी साडी घातली, मी असते तर या सरकारचा निषेध म्हणून काळी घातली असते. आता संक्रात जवळ आली आहे, या सरकारवर संक्रात येऊ द्या असे आमदार प्रणिती शिंदे (mla praniti shinde) यांनी राज्य (state government) आणि केंद्र सरकारवर (central government) टीका करताना म्हटले. (Maharashtra News)

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या अंगणवाडी सेवकांच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे त्यामुळे पूर्ण व्यवस्था कोलमोडली आहे. सरकारला अंगणवाडी सेविकांची काळजी नाही. राज्य शासन अंगणवाडी सेविकांचे वेतन वाढवते पण त्यातही दुतोंडीपणा करते. आम्ही केवळ 26 हजार रुपये मागतोय, तर नाही म्हणता. मग इतर वेळी 50 खोके कसं देता? अशी टीका आमदार शिंदेंनी सरकारवर केली.

हे सारकार निगरघट्ट झालेलं आहे. महिलांकडे बघण्याचा या शासनाचा दृष्टीकोन खालच्या पातळीचा असल्याचे आमदार शिदेंनी म्हटले. त्या म्हणाल्या देशासाठी मेडल मिळवणाऱ्या लेकीवर अत्याचार करणाऱ्या खासदाराला निलंबित केलं नाही. उलट उत्तर मागणाऱ्या लोकांना निलंबित केले. इतकं अहंकारी हे सरकार आहे असेही आमदार शिंदेंनी नमूद केले.

हे सारकार झोपलेले आहे, पन्नास खोके जेव्हा विषय येतो तेव्हाच ते जागे होतात. तुमचा संघर्ष फार मोठा आहे, घरातून पाय बाहेर ठेवून तुम्ही नवीन आकाश शोधता. अंगणवाडी ही तुमच्यासाठी दुसरं घर आहेत. संसारपणाला लावून तुम्ही अंगणवाडी सुधारण्यासाठी काम करता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केवळ पैसेसाठी नाही तर त्या मुलांचं भविष्य चांगल व्हावं यासाठी काम करता. त्यामुळे महिला आमदार म्हणून जरी कोणत्याही पक्षाचे असलो तरी आम्ही शांत बसणं म्हणजे पाप आहे. तुम्ही सर्वानी हिरवी साडी घातली, मी असते तर या सरकारचा निषेध म्हणून काळी घातली असते. आता संक्रात आहे, या सरकारवर संक्रात येऊ द्या असे आमदार प्रणिती शिंदेंनी म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT