Nana Patole News Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole News: शरद पवार आणि अजित पवार यांनी चोरून न भेटता उघडपणे भेटावे; नाना पटोले यांचा सल्ला

Nana Patole News: 'अजित पवार आणि शरद पवार यांनी लपून भेटण्यापेक्षा घरी भेटावे. आम्हाला त्याच्यात काहीही वेगळे वाटत नाही, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

Vishal Gangurde

शुभम देशमुख,

Nana Patole News:

पुण्यातील शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं होतं. पुण्यातील काका-पुतण्याच्या भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे. 'अजित पवार आणि शरद पवार यांनी लपून भेटण्यापेक्षा घरी भेटावे. आम्हाला त्याच्यात काहीही वेगळे वाटत नाही, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त करत सल्ला दिला आहे. (Latest Marathi News)

काँग्रेेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी भंडाऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील विविध मुद्द्यावर भाष्य केलं. शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी काँग्रेस फुटणार असा दावा केला. यावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले, 'महायुतीमध्ये जे लोक अस्वस्थ आहेत, तेच लोक अशा पद्धतीचे स्पष्टीकरण देतात. ही महायुती भय आणि भ्रष्टाचाराने व्यापलेली आहे. जनतेच्या प्रश्नांविषयी यांना काही घेणे देणे नाही'.

'आज झालेल्या तलाठीच्या परीक्षेमध्ये सर्व्हर डाऊन झाला. नांदेडच्या तरुणाला भंडाऱ्याचं सेंटर मिळालं, अशा पद्धतीने तरुणांची हेळसांड सुरू आहे. खासगी कंपन्यांना हे काम देऊन बेरोजगार मुलांकडून पैशांची लूट करून वाटाघाटी करण्याचे काम हे महायुतीतील नेते करीत आहेत, असे ते म्हणाले.

'भ्रष्टाचार वाढलेला आहे. बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकऱ्यांची लूट होत आहे अशा सर्व प्रश्नांना बगल देण्यासाठी त्यांच्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी प्रतापराव जाधव अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत. प्रतापराव जाधव यांच्या वक्तव्याला महत्व देऊ नका, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.

भाजप नेते, विजय गावित यांच्या वादग्रस्त वक्तव्याचाही नाना पटोले यांनी समचार घेतला. 'डॉक्टर विजय गावित यांच्या मंत्रिमंडळात सध्या निराशेचे वातावरण असल्यामुळे ते अशा पद्धतीचे वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. मासे खा आणि मुली पटवा, असे विधान करून ते त्यांच्या डोळ्यांचे उपचार करीत आहेत का, असे नाना पटोले म्हणाले. त्यांनी असं वक्तव्य करून राज्यमंत्र्यांनी संपूर्ण मुलींचा अपमान केला असून हे अतिशय चुकीचं आहे, असं मत नाना पाटील यांनी व्यक्त केलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या मुलाची काल रात्री चौकशी

Crime News: घरात पतीचा मृतदेह दिसताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; इंजिनिअर जोडप्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

New Labour Law: नवीन कायदा लागू; तुमचा पगार कमी होणार की वाढणार? लेबर कोडमध्ये नेमकं काय?

Mumbai Pune Tourist Spots: मुंबई-पुण्याजवळ वसलेल्या स्वर्गाहून सुंदर 'या' बेस्ट वीकेंड डेस्टिनेशनला द्या भेट

Oracle Layoff: कामावर येऊ नका; एका रात्रीत ३०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं | VIDEO

SCROLL FOR NEXT