pune News: शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी विजय वड्डटीवार यांना विरोधी पक्ष नेता केल्यावर नाराजीमुळं काँग्रेसचा एक मोठा गट फुटणार असल्याचा दावा केला. त्यावर काँग्रेसचा कुठलाही आमदार फुटणार नसल्याची माहिती काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी दिली आहे.
मात्र त्यांनतर विरोधीपक्ष नेता होण्याची इच्छा असूनही त्यांना डावललं जात असल्याच म्हणतं खंत व्यक्त केली. 'काँग्रेस आमदार फुटणार हा जावई शोध कुठून लागला? असा सवालही थोपटे यांनी उपस्थित केला. (Latest Marathi News)
राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष निशाणा
काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस पक्ष नाही तर पुण्यातील राजकीय शक्तींमुळं त्यांना डावललं जात असल्याचं म्हटलं. पुणे जिल्ह्यातल्या परकीय शक्तींच्यामुळे मला डावललं जात असल्याचं म्हणतं त्यांनी अप्रत्यक्षपणे पवार आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. पुणे जिल्हा म्हणलं डावलण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप थोपटे यांनी केला आहे.
'काँग्रेस आमदार फुटणार हा जावई ृशोध कुठून लागला? मला माहिती नाही, पण कुणाच्या अंर्तगत नाराजीमुळं आमदार फुटतील अशी आता तरी काँग्रेसमध्ये परिस्थिती नाही, असं म्हणून खासदार प्रतापराव जाधव यांच्या दावा फेटाळला.
'कामं करणाऱ्याला पद मिळावं अशी अपेक्षा असती, पण काँग्रेसमध्ये निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात, पक्षातील सर्वजण तो निर्णय अंतिम मानत असतो. मी विरोधी पक्षनेता पदाची संधी मिळावी म्हणून प्रयत्न करत होतो, आमदार म्हणून सलग तीन वेळा निवडून गेलो आहे. पक्षाची निष्ठा, पक्षाच धोरणं याबाबत आम्ही थोपटें कुटुंब कायम काँग्रेससोबत राहिलो आहे आणि राहू, असेही ते म्हणाले.
'कामं करणाऱ्या माणसाला वाटत, मला संधी मिळाली पाहिजे. मलाही 2019 ला मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, त्यानंतर विधानसभा अध्यक्षपद मिळेल अशी अपेक्षा होती आणि आता विरोधी पक्ष नेते पद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तीही संधी मला मिळाली नाही, असेही थोपटे पुढे म्हणाले.
'पुणे जिल्हा म्हणलं की का डावललं जातंय, मला समजत नाही. काँग्रेस पक्षश्रेष्ठी डावलत आहेत असं नाही, पण पुण्यामध्ये राजकीय शक्ती कुणाची आहे, त्यांच्याकडून डावललं जात आहे, असा आरोप थोपटे यांनी यावेळी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.