Sanjay Raut: राजकीय आखाडा तापला! भाजपच्या बड्या नेत्याचं संजय राऊतांना थेट आव्हान, म्हणाले...

Girsh Mahajan: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत हे लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळं महाराष्ट्रातील राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSaam tv
Published On

संजय महाजन, जळगाव

Sanjay Raut News In Marathi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत हे लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळं महाराष्ट्रातील राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राऊत यांना थेट आव्हान दिले आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत (Sanjay Raut Contest Loksabha Elections) लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात घोंघावू लागल्या. त्यानंतर काही वेळातच राज्यात मोठं राजकीय वादळ उठलं. ईशान्य मुंबईतून ते निवडणूक आखाड्यात उतरू शकतात, असं बोललं जातं. विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले जात आहेत.

Sanjay Raut
Sanjay Raut News : लोकसभेआधीच महाराष्ट्रात धुरळा! शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्याचं संजय राऊतांना थेट चॅलेंज

काही लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्यांना बोलायला काय जातं. असं असेल तर त्यांनी निवडणूक (Loksabha Elections 2024) लढवून दाखवावी, असं आव्हान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी राऊत यांना दिलं होतं. तर भाजपच्या नेत्यांकडूनही राऊतांवर टीका होऊ लागली आहे. (Maharashtra Political News)

संजय राऊत यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवूनच दाखवावी. किती मतं मिळतात हे तपासून बघावं. ते नगरपालिका, महापालिका निवडणूक लढलेले नाहीत, असं असताना नुसत्या गप्पा मारणं सोपं असतं, अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी राऊतांवर टीकेचा बाण सोडला.

ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज

लोकसभा निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. पण त्याआधीच राजकीय रण तापू लागले आहे. सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यादृष्टीने पक्षाचे नेते तयारीला लागले आहेत. ठाकरे गटाचा तालुका प्रमुखांचा मेळावा २ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे.

Sanjay Raut
Chitra Wagh News: 'दररोज मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर' गावितांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या...

हा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात होणार असल्याचे सांगितले जाते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील सर्व लोकसभानिहाय आढावा बैठका सध्या मातोश्रीवर सुरू असून, यानंतर लगेच राज्यातील सर्व तालुका प्रमुखांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक तयारीच्या दृष्टीने आणि संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी हा मेळावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com