
सूरज मसुरकर
Chitra Wagh News: भाजप नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री विजयकुमार गावित यांनी दररोज मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर झाले,असं वक्तव्य केल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. मंत्री विजयकुमार गावित यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मंत्री विजयकुमार गावित यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
'मासे खाल्ल्याने डोळे ऐश्वर्या राय सारखे होतात, असा अजब दावा विजयकुमार गावित यांनी केला. धुळ्यातील एका कार्यक्रमात बोलताना गावित यांनी असा दावा केला. मंत्री विजयकुमार गावितांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. तर गावित यांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, 'मी मंत्री विजयकुमार गावित यांच्याशी सविस्तर बोलले. त्यांनी मला सांगितले की, माझ्या विभागात कार्यक्रम होता, आदिवासी तरुणांनी मासेमारी करावी यासाठी ते होतं'.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, 'लोकप्रतिनिधी यांनी बोलताना तारतम्य बाळगळ पाहिजे. ते मासे खाल्याने काय फायदे होतात हे सांगत होते, पण विपर्यास केला गेला. पण कोणीही असो बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. ते आदिवासी तरूणांनी मस्तव्यवसायात यायला हवं म्हणून बोलले'.
'कोणीही नेता असला तरी तारतम्य बाळगलं पाहिजे. तोलून मोलून गोष्टी बोलल्या पाहिजेत. बोलण्यातून त्यांनी ऐश्वर्या राय यांचं उदाहरण दिले. तरी सुद्धा अशी वक्तव्य करताना तारतम्य बाळगळ पाहिजे,असेही त्या म्हणाल्या.
गावित काय म्हणाले होते?
'ऐश्वर्या रायला बघितलं का? नियमित मासे खाल्ल्यामुळेच तिचे डोळे सुंदर झाले. ती समुद्र किनारी राहणारी असून त्यामळे दररोज मासे खायची. तिचे डोळे बघितले ना कसे झाले? मासे खाल्ले तर तुमचेही डोळे तसेच होणार, असे विजयकुमार गावित म्हणाले होते.
'मासे खाल्ले की बाईमाणूस चिकने दिसायला लागतात. डोळ्याला तरतरी येते. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वचाही चांगली दिसते. कुणीही बघितलं तर लगेच पटणार, असेही ते पुढे म्हणाले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.