Maharashtra Political News: वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागपूर पुन्हा एकदा हादरलं आहे. उपराजधानी नागपुरात २४ तासांत चार वेगवेगळ्या घटनेत तिघांची हत्या झालीये. तसेच जीवघेण्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झालेत. त्यामुळे नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.(Latest Marathi News)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या गंभीर विषयावर ट्वीट करत राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलीये की नाही हे असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकस्त्र सोडलं आहे.
जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, "राज्याची उपराजधानी आणि खुद्द गृहमंत्री यांचे प्रतिनिधित्व लाभलेल्या नागपुरात तब्बल तिघांची हत्या झाली असून जीवघेण्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे नागपुरात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यभर घडत असलेल्या गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकरणांमुळे पोलीस प्रशासनावरही प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी सरकारने प्राधान्य द्यावे."
महेश कुमार उईके या तीस वर्षीय मजुराची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. जरीपटका पोलीस स्टेशनअंतर्गत नारा परिसरात काल रात्री उशिरा हत्येची ही पहिली घटना समोर आली. आरोपी मजूर हा त्याचा मित्रच होता. महेश सातत्याने आरोपीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा त्यामुळे आरोपीने धारधार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली.
रविवारी संध्याकाळी सात वाजता हत्येची दुसरी घटना समोर आली. नागपूरमधील यशोधरा नगर पोलीस स्टेशनअंतर्गत कांजी हाऊस चौकात ही घटना घडली होती. पूर्ववैमनस्यातून एका गुन्हेगाराने त्याच शहरातील दुसऱ्या गुन्हेगाराची हत्या केली आहे. बदला घेण्याच्या भावनेतून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
काटोल नाक्याजवळ हत्येची तिसरी घटना घडलीये. आली. काही दिवसांपासून मेहबूब खान नावाचा व्यक्ती बेपत्ता होता. काल परिसरातील नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. नागपुरातील कपिल नगर पोलीस स्टेशनमध्ये मेहबूब बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. रविवारी दुपारी त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर हत्या नेमकी कोणी केली याचा तपास पोलीस करत आहेत.
हुडकेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत खरसोली गावात शुल्लक कारणावरुन दाम्पत्यावर हल्ला करण्यात आलाय. परिसरात एका लहान मुलाचा नामकरणाचा कार्यक्रम होता. यावेळी शुल्लक कारणावरून एक व्यक्ती दाम्पत्यासोबत भांडू लागला. वाद विकोपाला जाऊन आरोपीने दाम्पत्यावर हल्ला केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.