Prithviraj Chavan, Supreme Court, Maharashtra saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : सर्वाेच्च न्यायालयाचं चाललंय काय ? काॅंग्रेसचा ज्येष्ठ नेता नाराज

देशात एका पक्षाची हुकूमशाही सुरू आहे. विरोधकांचे आवाज आणि विरोधकांना संपवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

विजय पाटील

Prithviraj Chavan : चुकीच्या घडलेल्या घटनांचे "घड्याळ आता उलट फिरवणार आहे का ? असा प्रश्न सर्वाेच्च न्यायालयाबाबत (Supreme Court) माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी उपस्थित केला आहे. याबराेबरच सर्वाेच्च न्यायालयाचं काय चाललंय ? असं देखील आमदार चव्हाण यांनी नमूद केलं आहे. आमदार चव्हाण हे आज (बुधवार) सांगलीत (Sangli) आले हाेते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Sangli Latest Marathi News)

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षातील (Maharashtra Politics News) सर्वाेच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीनंतर आमदार चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले आज काहीतरी निकाल होईल असं अपेक्षित होतं मात्र फार लांबलचक आणि गुंतागुंतीचा हा सगळा मामला आहे. आम्हाला आश्चर्य वाटतंय सर्वाेच्च न्यायालयाचे सुटीतील खंडपीठ दोन न्यायाधीशांनी जो निर्णय दिला तो आश्चर्यकारक होता. खरंतर निलंबनाची कारवाई प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांना शपथ देणे हेच चुकीचं होतं असेही आमदार चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले त्यानंतर अध्यक्षांची निवड देखील होऊन गेलेली आहे आता या घड्याळाचे काटे सर्वाेच्च न्यायालय उलटे फिरवणार आहे का ? त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयात काय चाललंय असा प्रश्नही उपस्थित हाेत आहे. (Supreme Court News)

आमची आणि संपूर्ण देशातल्या जनतेची अपेक्षा आहे की डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत अभिप्रेत होते. न्यायदेवतेने कायद्याप्रमाणे न्याय दिला पाहिजे पण ते होताना दिसत नाही. उद्या त्या ठिकाणी मोठं बेंच बसेल आणि ते कायद्याप्रमाणे न्याय देईल आणि यातून राज्यातली परिस्थिती स्थिरस्थावर होईल. यापुढे असा घोडा बाजार चालणार नाही असे मत देखील आमदार चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT