Yashomati Thakur, Congress, Maharashtra Cabinet Expansion Saam Tv
महाराष्ट्र

Yashomati Thakur : शिंदे-फडणवीस सरकारचं हे ‘व्हाईट वॉश’ मंत्रिमंडळ आहे का ? (व्हिडिओ पाहा)

आज राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर विराेधी पक्षातील नेते मंत्र्यांच्या निवडीवरुन टीका करु लागले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Yashomati Thakur : राज्याच्या मंत्रिमंडळाचा (Maharashtra mantrimandal vistar 2022) आज विस्तार झाला. नव्या मंत्रिमंडळात एकाही महिलेस स्थान न दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde lates news) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis latest news) यांच्या सरकारवर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी टीका केली. याबराेबरच राज्याच्या माजी मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी देखील मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेचा समावेश नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले आहे.

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या आज ९ ऑगस्ट क्रांती दिनी आम्ही भारत जाेडाे आंदाेलन सुरु केले आहे. काॅंग्रेसच्या माध्यमातून हे अभियान सुरु आहे. आज महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यात एकही महिलेचा समावेश नाही याचे आश्चर्य वाटतं. मंत्रिमंडळ विस्ताराचा जोक होऊ शकतो अशी टिप्पणी देखील ठाकूर यानी केली.

याबराेबरच यशाेमती ठाकूर यांनी शिंदे फडवणीस सरकारमधील मंत्री वाशिंग पावडरने धुतले आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी नवनिर्वाचित संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करुन त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याने चित्रा वाघ यांची काय प्रतिक्रिया येते याची मी वाट बघत आहे असंही त्यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT