Crime News : पत्नीचा खून करुन पतीनं केली आत्महत्या

पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत.
crime news, chandrapur crime news
crime news, chandrapur crime newssaam tv

चंद्रपूर : चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यात काैटुंबिक वादातून पतीनं पत्नीचा खून केला आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. या कृत्यामुळं कुटुंबातील मुलं मात्र अनाथ झाली आहेत. पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत. (chandrapur latest marathi news)

चंद्रपूर शहरानजीकच्या देवाडा गावात महाकाली नगरी भागात धक्कादायक घटना उजेडात आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली अशी प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली. त्यानंतर पतीनं देखील आत्महत्या केल्याचे पाेलिसांनी सांगितले.

crime news, chandrapur crime news
Maharashtra Rain : मुंबईसह राज्याला पावसानं झाेडपलं, वाचा कूठं काय घडलं

सुधाकर आणि स्नेहा डाहूले असे मयत पती पत्नीचे नाव आहे. सुधाकर स्वतः खाजगी इलेक्ट्रिशियन म्हणून कामे करायचा. पोलिसांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाच्या पथकास पाचारण करत खोल विहिरीतील सुधाकरचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेने डाहूले यांच्या चौकोनी कुटुंबातील लहानगे मुलगा-मुलगी मात्र उघड्यावर आले. पडोली पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

crime news, chandrapur crime news
Tortoise : बसस्थानक परिसरात आढळलं पाेतं; पाेलिसांमुळं २१ कासवांना मिळालं जीवदान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com