Maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी होताच विरोधकांचा इशारा, कोणत्या ४ प्रमुख मागण्या केल्या?

Maharashtra Political News: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर महाविकास आघाडी अॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी होताच विरोधकांनी इशारा दिला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या जल्लोषात आझाद मैदानावर पार पडला. या शपथविधी सोहळ्यात तिन्ही प्रमुख नेत्यांनी शपथ घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होताच विरोधकांनी मोठा इशारा दिला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफी, सोयाबीन, लाडकी बहीण योजना आणि नोकरभरती यावरून महायुती सरकारला इशारा दिला आहे. नाना पटोले यांनी महायुतीकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत.

नाना पटोले म्हणाले, 'निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळा करून मतांची चोरी करणारे सरकार स्थापन झालं आहे. चोरीचे बहुमत असतानाही नव्या सरकारची स्थापना वादाने झाली आहे. तीन पक्षांच्या अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे. महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे सरकार बसले असले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये, असे नाना पटोले यांनी पुढे म्हटले आहे.

'महायुतीकडे बहुमत आहे. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी कसरत करावी लागली. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना या सरकारमध्ये फारसे महत्व दिले जाईल असं वाटत नाही. एकनाथ शिंदे यांची भाजपला काहीच गरज नाही. बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भाजप आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी जागा दाखवून दिली आहे. भाजपने दोन्ही प्रादेशिक पक्ष संपवले आहे, असे ते पुढे म्हणाले.

'भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागणार आहेत. शेतकरी कर्जमाफी, कृषी पंपाची वीज बिल माफी, लाडकी बहीण योजना दरमहा २१०० रुपये, २.५ रिक्त सरकारी पदांची भरती, तातडीने अंमलबजावणी करावी. काँग्रेस पक्षाची विधानसभेतील संख्या कमी झाली आहे. परंतु हिम्मत आणि ताकद कायम आहे. जनतेंच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

SCROLL FOR NEXT