Nana Patole  Saam TV
महाराष्ट्र

वाढदिवसानिमित्त नाना पटोले यांचा नवा संकल्प, रोजगाराच्या प्रश्नावर केलं मोठं विधान

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नवा संकल्प केला आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा : राज्यात महाविकास आघाडी सरकार (mva government) सत्तेत आल्यापासून विरोधकांनी अनेक मुद्द्यांवरुन सरकारवर टीका केली. तीन चाकांची महाविकास आघाडीची गाडी लवकरच राजकीय पटलावर कोसळेल, असं भाकीतही विरोधी पक्षनेते (Devendra fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारने विरोधकांना टीकेला जशाच तसे उत्तर देण्यासाठी विकासकामांच्या संकल्पनेचा निर्धारही केला. असाच काहीसा संकल्प आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केला आहे. महाराष्ट्रात दोन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था तयार करणार असून एक कोटी नागरिकांना रोजगार (Employment) देण्याचा संकल्पच नाना पटोले यांनी केला आहे.

वाढदिवसानिमित्त नाना पटोले माध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही दोन दिवसांपूर्वी शिर्डी येथे नवसंकल्प अधिवेशन घेतले असून त्याच्या माध्यमातून घेतलेली भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत. तसचे महाविकास आघाडी सरकारकडूनही याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचं ठरलं आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मारले असून आता आम्ही महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी दोन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था तयार करणार आहोत. त्या माध्यमातून एक कोटी तरुणांना रोजगार देणार आहोत. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना ताठ मानेनं जगता येणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने जाती-धर्मात निर्माण केलेला द्वेष थांबविण्याचा संकल्पही केला असल्याचे नाना पटोले म्हणाले.

Edited by - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Dhanush : साऊथचा किंग धनुष किती कोटींचा मालक? संपत्तीचा आकडा वाचून डोळे भिरभिरतील

Maharashtra Live News Update: लोकसभेत गदारोळ, कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब

एकनाथ खडसेंवर मुलाच्या हत्येचा आरोप, निखिलसोबत त्यावेळी काय झालं होतं? रोहिणी खडसेंनी सगळंच सांगितलं

Today Gold Rate: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमतीत बदल झाला का? वाचा आजचे दर

Shravan Somwar: श्रावणातील पहिल्या सोमवारी शंकरासाठी हे उपाय नक्की करा; मनातील प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

SCROLL FOR NEXT