कोरोनाची चौथी लाट म्हणूयात, पण घाबरायचं कारण नाही; आदित्य ठाकरे म्हणाले...

दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळं नागरिकांची चिंता वाढली आहे.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Saam Tv

सुशांत सावंत

मुंबई : दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळं (corona new patients) नागरिकांची चिंता वाढली आहे. मुंबईत कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. काल शनिवारी ८८९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी मुंबई पालिकेनंही (bmc) नारिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. मास्कबाबत सक्ती नाही, पण गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, असं आवाहनही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केलं आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनाची चौथी लाट म्हणूयात, मात्र घाबरायचं कारण नाही. कोरोना रुग्ण वाढत आहे. पण चिंताजनक परिस्थिती नाही. असे असले तरी नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असं आवाहन ठाकरे यांनी नागरिकांना केलं आहे.

Aditya Thackeray
कोरोना झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; राज्यसभेसाठी बैठकीला लावणार हजेरी

मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील थिएटर मध्ये 'माझी वसुंधरा' अभियान २.० कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरें म्हणाले, साडे अकरा हजार गावांनी या अभियानात सहभाग घेतला होता. विजेत्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.याच दरम्यान काश्मिरी पंडीतांवरही ठाकरेंनी भाष्य केलं. काश्मीरमधील दृश्य ठीक नाहीत. परिस्थिती जैसे थे आहे. काश्मीर मध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. पण काश्मीर पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे नेहमी उघडे आहेत, असंही ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray
सूर्याचा उद्रेक..गोंदिया जिल्‍ह्यात 45.6 डिग्री सेल्सियस

बातमी येते की, वृक्ष तोडणी होणार,मात्र प्रत्यक्षात त्याची परवानगी दिलेली नसते. तो प्रस्ताव असतो त्यावर अभ्यास केला जातो, घाबरू नका पर्यावरणासाठी शाश्वत काम करत आहोत. उपमुख्यमंत्री अजित पावर यांच्याकडून आम्ही फीडबॅक घेत असतो. ते प्रेमाने सांगतात. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही फीडबॅक घेत असतो. डाओस मध्ये तब्बल 80 हजार कोटी गुंतवणूक घेऊन आलो आहोत, अंसंही ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com