गोंदिया : जून महिन्यात गोंदियात सूर्याचा उद्रेक पहायला मिळत असून आज गोंदियाचे तापमान 45.6 डिग्री सेल्सियस पोहचले आहे. त्यामुळे विदर्भात गोंदिया (Gondia) आज सर्वात उष्ण जिल्हा ठरला आहे. (gondia news Sun eruption 45 degree Celsius high temperature in Gondia district)
सलग चार दिवस झाले पावसाने (Rain) जिल्ह्यावर नाराजी व्यक्त करत आपली अनुपस्थीती दाखविली आहे. त्याच्या परिणाम म्हणून की काय गोंदिया तापमान वाढ आपल्या सर्वोच्च सिमेवर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात उन्हाची काहिली बघता अघोषित कर्फ्यू लागला आहे. मागील चार दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला. मात्र पावसाने दांडी मारल्याने तापमानात (Temperature) प्रचंड वाढ झाली आहे. वाढती उष्णता लक्षात घेता लोकांनी घरी राहाणे पसंत केल्याने रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. त्यामुळे लवकर पावसाचे आगमन व्हावे हीच इच्छा जिल्हावासीय व्यक्त करीत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.