काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना मातृशोक SaamTvNews
महाराष्ट्र

काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना मातृशोक

सुमित्राबाई ठाकरे यांनी वयाच्या १०२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय राठोड

यवतमाळ : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मातोश्री सुमित्राबाई गोविंदराव ठाकरे यांचे आज रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास वार्धक्यामुळे निधन झाले. सुमित्राबाई यांनी वयाच्या १०२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दारव्हा तालुक्यातील हरू या गावातील सुमित्राबाई ठाकरे यांनी पुत्र माणिकराव ठाकरे (Manikrao Thakare) यांच्या आयुष्याला खरे वळण दिले. कणखर भूमिका, स्वभावातील बाणेदारपणा त्यांनी आयुष्यभर जोपासला होता. शेतीवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. वार्धक्य अवस्थेतही त्या शेतात नित्याने जायच्या. गावात त्यांचा आदरपूर्वक दरारा होता.

हे देखील पाहा :

आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी गावाशी आपली ‘नाळ’ जोडून ठेवली होती. मुलगा माणिकराव ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रात नवनवी यशाची शिखरे पादाक्रांत केल्यानंतरही त्यांनी कधीच जगण्यातला साधेपणा सोडला नव्हता. अनेकवर्ष माणिकराव ठाकरे यांचेकडे मंत्रिपद, पक्ष संघटनेत प्रदेशाध्यक्षपदासारखी धुरा, विधानपरिषदेचे उपसभापतिपद असतानाही त्यांचा गावातील लोकांसोबत असलेला जिव्हाळा कायम होता. राजकारणातील व्यस्ततेतूनही माणिकराव ठाकरे आपल्या आईच्या सेवेत रमायचे. अलीकडे वृद्धापकाळामुळे त्या कुटुंबातच रमल्या होत्या.

वयाची शंभरी पार केल्यानंतर गत दोन वर्षांपासून त्या पूर्णत: थकल्या होत्या. आज रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्यांनी यवतमाळातील निवासस्थानी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात पुत्र माणिकराव ठाकरेंसह तीन मुली, जावई, नातू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, अतुल ठाकरे अशा बराच मोठा आप्तपरिवार आहे. दारव्हा तालुक्यातील हरू या मूळगावी सोमवारी २१ मार्च ला सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT