Maharashtra Politics : Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत NDAचा पराभव होणार; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

Vishal Gangurde

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला १७ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या. निकालानंतर अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं पारडं जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याचदरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीत एनडीएचा पराभव होणार असल्याचा दावा केला आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी 'एक्स'वर पोस्ट करत आगामी विधानसभेवर मोठं भाष्य केलं. जयराम रमेश यांनी म्हटलं की, प्रफुल पटेल यांनी प्रधानमंत्र्यांची ऑफर पदावनती असल्याचे सांगत मंत्रालयात राहण्याची ऑफर नाकारली. भाजप ब्रँडच्या वॉशिंग मशीनचे एक विविध मोड आहेत. त्यात स्लो, फास्ट आणि सुपर-फास्ट त्यांनी कट केला नसावा. दुसरीकडे रवनीत बिट्टू लुधियानामध्ये पूर्वाश्रमीच्या पक्षाकडून पराभव झाला आहे. ते सुपर-फास्ट मोडवर आहेत'.

'दुसरे व्यक्त ज्यांच्यावर कृपादृष्टी झाली नाही, ते म्हणजे एकनाथ शिंदे. शिंदे यांच्या पक्षाकडे एक राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार आहे. त्यांच्या पेक्षाही कमी असूनही जितन राम मांझी, चिराग पासवान आणि एचडी कुमारस्वामी हे त्यांच्या पेक्षा वरचढ ठरले आहेत, असे ते म्हणाले.

पंतप्रधान हे महाराष्ट्रातील सर्व गुंतवणूक गुजरातमध्ये घेऊन जातात. ते महाराष्ट्रातील युतीच्या मित्रपक्षांना निकृष्ट समजतात. ही तीच युती आहे, ज्यांनी दोन पक्ष फोडून निर्माण केली. आगामी काळात राज्यात विधानसभा निवडणुकीत एनडीएचा पराभव होणार आहे. त्यापूर्वीच त्यांनी सूडाचे राजकारण सुरू केले आहे, असे जयराम रमेश पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT