Eknath Shinde, Devendra Fadnvis Saam Tv
महाराष्ट्र

मुंबईतील 'Phone Pay' कंपनीचे मुख्यालय कर्नाटकात जाणार? काँग्रेस नेत्याचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणीक

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे वेदांत फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्कसारखे महाराष्ट्रात येणारे प्रकल्प परराज्यात गेल्यानंतर आता फोन पे कंपनीने (Phone Pay Headquarter) सुद्धा मुंबईतील मुख्यालय कर्नाटकमध्ये हलवण्याची तयारी सुरु केली आहे. या सर्व गोष्टींना शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार आहे. वेदांत फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) सारखा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये (Gujrat) गेल्यानंतर आता बल्क ड्रग पार्क हा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प देखील कर्नाटकमध्ये हलवण्यात आला आहे.

तसेच भारतातील नामांकित कंपनी फोन पे ने सुद्धा आपले मुंबईतील मुख्यालय कर्नाटकमध्ये हलवण्याची तयारी सुरु केली आहे. हे सर्व प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यामागे शिंदे- फडणवीस सरकारचा नाकर्तेपणा आहे,असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी राज्य सरकारवर केला आहे. (congress leader bhai jagtap slams maharashtra government)

राज्यासाठी विधायक व जनतेच्या हिताची कामे करण्याऐवजी उत्सव साजरे करणे,बंडखोर आमदारांच्या विभागात सभा व बैठका घेणे, इतर पक्षातील लोक शिंदे गटात सामील करणे,दिल्लीवाऱ्या करणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असूनसुद्धा दर आठवड्याला दिल्लीवारी करून मोदी-शहांच्या इशाऱ्यावर सरकार चालवणे यामध्येच हे शिंदे-फडणवीस सरकार मग्न आहे.म्हणूनच हे सर्व प्रकल्प महाराष्ट्रात येणारे प्रकल्प इतर राज्यामध्ये जाण्यासाठी हे शिंदे-फडणवीस सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे, अशी खरमरीत टीका जगताप यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

जगताप पुढे म्हणाले, बल्क ड्रग पार्क या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी मंत्रिमंडळाने रायगड जिल्ह्यात अडीच हजार कोटींची जागाही दिली होती. तसेच हा प्रकल्प जर महाराष्ट्रात आला असता तर जवळपास ८० हजार ते १ लाख युवकांना रोजगार मिळाला असता.आपल्या महाराष्ट्रात शेकडो फार्मसी कॉलेजे आहेत. तसेच ज्या काही नामांकित औषध निर्मिती कंपन्या आहेत,त्या सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.

असे असताना शिंदे- फडणवीस सरकारला हा प्रकल्प महाराष्ट्रात आणता आला नाही, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.हे कमी होते की काय? म्हणून आता फोन पे या देशातील नामांकित कंपनीने देखील मुंबईतील मुख्यालय कर्नाटकमध्ये हलविण्याची तयारी सुरु केली आहे. हे सर्व या शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळेच झाले आहे.त्यासाठी त्यांचा निषेध करावा तितका थोडाच आहे.

जी गोष्ट या प्रकल्पांबाबत तीच वर्सोवा-वांद्रे सी लिंकबाबत घडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागील ७ वर्षांपासून नगरविकास खाते आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी विविध पदांच्या भरतीच्या मुलाखतीचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे.प्रकल्प महाराष्ट्राचा आणि मुलाखती चेन्नईमध्ये.हा काय प्रकार आहे? महाराष्ट्रातील मुलांनी मुलाखत द्यायला चेन्नई मध्ये जायचे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास खाते घेऊन काय करत आहेत, असा सवाल देखील भाई जगताप यांनी उपस्थित केला.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT