Congress Fourth List Saam Tv
महाराष्ट्र

Congress Fourth List : अंधेरी पश्चिममधून काँग्रेसनं उमेदवार बदलला, काँग्रेसची चौथी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? जाणून घ्या

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसची चौथी यादी यादी जाहीर केली आहे. या चौथ्या यादीत अंधेरी पश्चिममधून काँग्रेसनं उमेदवार बदलला आहे.

Satish Kengar

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीत 14 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात मुंबईच्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेने उमेदवार बदलला आहे.

येथून काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र सावंत यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता अंधेरी पश्चिम येथून पक्षाने अशोक जाधव यांना उमेदवारी जाहीर केली.

कोणाला कुठून मिळालं तिकीट?

१.अमळनेर : डॉ.अनिल शिंदे

२. उमरेड - अनुसूचित जाती: संजय नारायणराव मेश्राम

३. आरमोरी - एसटी : रामदास मसराम

४. चंद्रपूर - अनुसूचित जाती: प्रवीण नानाजी पाडवेकर

५. बल्लारपूर : संतोषसिंग चंदनसिंग रावत

६. वरोरा : प्रवीण सुरेश काकडे

७. नांदेड उत्तर : अब्दुल सत्तार अब्दुल गफूर

८. औरंगाबाद पूर्व : लहू एच. शेवाळे

९. नालासोपारा : संदीप पांडे

१०. अंधेरी : अशोक जाधव पश्चिम

११. शिवाजीनगर : दत्तात्रय बहिरट

१२. पुणे कॅन्टोन्मेंट - अनुसूचित जाती: रमेश आनंदराव भागवे

१३. सोलापूर दक्षिण : दिलीप ब्रह्मदेव माने

१४. पंढरपूर : भगीरथ भालके

याआधी काँग्रेसने तीन याद्या जाहीर केल्या आहेत. ज्या पहिल्या यादी काँग्रेसने ४८ उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीत २३ उमेदवारांची घोषणा केली होती. आता तिसऱ्या यादीत १६ आणि आता चौथ्या यादीत १४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT