Congress Saam TV
महाराष्ट्र

काँग्रेस महासचिवाचा थेट सोनिया गांधींकडे राजीनामा; राज्यसभा उमेदवारीवरुन नाराजी

'महाराष्ट्रात इम्रान प्रतापगढी (यूपीमधून) लादल्यामुळे, मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे.'

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : काँग्रेसचे महासचिव आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgadhi) यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या देशमुखांनी हा राजीनामा दिला आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन काँग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत खदखद असल्याच्या चर्चा सुरु असतानाच, आशिष देशमुख यांनी महासचिव पदाचा राजीनामा थेट सोनिया गांधीकडे (Sonia Gandhi) पाठवला आहे. शिवाय देशमुख यांनी 'मी काँग्रेसमध्ये येताना सोनिया गांधी यांनी राज्यसभेची उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं होतं.' ते पाळलं नाही असा आरोप देखील केला आहे.

हे देखील पाहा -

महाराष्ट्रात इम्रान प्रतापगढी (यूपीमधून) लादल्यामुळे मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे, बाहेरचा उमेदवार लादल्याने पक्षवाढीच्या दृष्टीने फायदा होणार नाही. परराज्यातील उमेदवार महाराष्ट्रावर लादने हा महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. एक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेस पक्षासोबत काम करत राहीन आणि वचनबद्धतेची पूर्तता करेन असं देखील त्यांनी या राजीनामा पत्रात लिहलं आहे.

दरम्यान, काँग्रेसने राज्यसभेसाठी बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसवर विरोधकांकडून टीका होत आहेच. मात्र, काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देखील या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली असून, शक्य असल्यास हा उमेदवार बदलावा असा सल्ला देखील चव्हाण यांनी दिला होता. तर हा निर्णय हायकमांडने घेतला असून काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला होता मात्र, देशमुखांच्या राजीनाम्यामुळे पटोलेंचा हा दावा मोडीत निघाला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT