Sudhakar Bharsakale resigns from Congress, triggering political unrest in Amravati district. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठं खिंडार; विदर्भातील बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Sudhakar Bharsakale Resignation Reason In Amravati: अमरावती जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून स्थानिक नेते सुधाकर भारसाकळे यांनी गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला आहे.

Omkar Sonawane

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कॉँग्रेसचे स्थानिक नेते सुधाकर भारसाकळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कॉँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि सतत सुरू असलेल्या मतभेदांना कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पक्षांतर्गत वातावरणाबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी पदाचा त्याग केल्याचे बोलले जात आहे.

सुधाकर भारसाकळे हे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच ते भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांचे भाऊ असल्याने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे विशेष लक्ष लागले आहे. आता सुधाकर भारसाकळे कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अद्याप कळू शकले नाहीये. अलिकडेच झालेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीपासूनच दर्यापुर काँग्रेसमध्ये अनेक राजकीय घडामोडी सुरू होत्या. भारसाकळे यांनी खासदार बळवंत वानखेडे आणि जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. याआधीही जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनीही काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भारसाकळे म्हणाले, दर्यापुर नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवारांची तिकिटे ऐनवेळी जिल्हाध्यक्ष आणि खासदार यांनी नाकारली होती. तसेच नगरसेवक आणि त्यांच्यात वाद निर्माण करण्याचे कामही या नेत्यांकडून करण्यात आले. काही दिवसापूर्वीच दर्यापूरमध्ये अल्पसंख्याक सेलच्या नियुक्त्या करण्यात आल्या, ज्याची कुठलीही कल्पनाही देण्यात नव्हती आली असे ही ते म्हणाले.

दर्यापुर तालुक्यातील बहुतेक संस्था काँग्रेसकडे असून यामध्ये कृषि उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी विक्री संघ, काही ग्रामपंचायती आणि सेवा सहकारी सोसायट्यांचा समावेश आहे. भारसाकळे यांच्या पत्नी येथील नगराध्यक्ष आहेत, तसेच जिल्ह्याचे खासदार बळवंतराव वानखेडे यांचा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात काँग्रेसचे मोठे वर्चस्व आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT