Rahul Gandhi Yandex
महाराष्ट्र

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्याची तारीख ठरली; गोदावरीच्या आरतीसह करणार काळारामाचे दर्शन

Rahul Gandhi On Nashik Visit: गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे राजकीय महत्व वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर होते. त्या पाठोपाठ आता राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.

Rohini Gudaghe

अभिजीत सोनवणे

Lok Sabha Election Rahul Gandhi On Nashik Visit

लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकी. पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणामुळे आता नाशिक शहराचंही राजकीय महत्व वाढलं आहे. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi), ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतर अनेक नेते नाशिक दौऱ्यावर होते. त्याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते राहुल गांधीदेखील मार्च महिन्यात नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. (Latest Political News)

पंतप्रधान नरेंद्र मोदींपाठोपाठ आता राहुल गांधीही पुरातन श्री काळाराम चरणी नतमस्तक होणार (Rahul Gandhi On Nashik Visit) आहेत. भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला नाशिकमधून जाणार आहे. येत्या १२ मार्चला राहुल गांधी नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात जाणार आहेत. नाशिकमध्ये ते रामरायाचं दर्शन घेणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राहुल गांधींचा नाशिक दौरा

भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे ११ मार्चला सभा घेणार आहेत. तर १२ मार्चला राहुल गांधी नाशिक शहरात येणार आहेत. १२ मार्चला सकाळी ११ वाजता त्यांचा भव्य रोड शो होणार आहे. त्यानंतर ते श्री काळारामाच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती मिळतेय.

याआधी जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदींनी युवा महोत्सवाच्या निमित्तानं नाशिकमध्ये काळारामाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील श्री काळाराम मंदिरात रामरायाच दर्शन घेऊन आरती केली (Nashik Visit) होती. मनसेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं येत्या ८ मार्चला मनसे प्रमुख राज ठाकरे देखील श्री काळारामाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राहुल गांधी आता नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या टप्प्यातील 'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Nyay Yatra) मणिपूरमधून सुरू झाली आहे.

मार्च महिन्याच्या सुरूवातीला ही यात्रा नाशिकमध्ये पोहचणार आहे. या यात्रेचा समारोप मुंबईत होणार (Congress) आहे. याबाबत सध्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमांचं नियोजन सुरू आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Back Blouse Design: ब्लाउजच्या गळ्यांचे बॅकलेस सुंदर डिझाइन, प्रत्येक लूकमध्ये दिसाल उठून

Maharashtra Live News Update: परभणीत पहिल्याच दिवशी महापालिकेत अर्जासाठी भावींच्या रांगा

Guhaghar : न्यू इयर सेलिब्रेशनसाठी बाहेर फिरला जायचे आहे पण वेळ नाही , मग 'या' ठिकाणी प्लान करा वन डे पिकनिक

Dnyanada Ramtirthkar : अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर अडकणार लग्न बंधनात, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Aries yearly horoscope: मेष राशीच्या व्यक्तींसाठी कसं असणार नवं वर्ष? कशी असेल आरोग्य आणि लव्ह लाईफ, पाहा

SCROLL FOR NEXT