Zeeshan Siddique: 'राहुल गांधी यांना पदावरून हटवलं पाहिजे', काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असलेल्या झिशान सिद्दीकींचा थेट हल्लाबोल

Maharashtra Politics News: राहुल गांधी यांच्या कुटुंबातील सदस्य हे भाजपमध्ये आहेत. म्हणून राहुल गांधी यांनाही पदावरून हटवले पाहिजे, असं काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी म्हणाले आहेत.
Zeeshan Siddique Preparing to Quit Congress
Zeeshan Siddique Preparing to Quit CongressSaam Tv
Published On

>> संजय गडदे

Zeeshan Siddique Preparing to Quit Congress:

राहुल गांधी यांच्या कुटुंबातील सदस्य हे भाजपमध्ये आहेत. म्हणून राहुल गांधी यांनाही पदावरून हटवले पाहिजे, असं काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच झिशान सिद्दीकी यांचे वडील आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यानंतर आता झिशान सिद्दीकी यांना मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवण्यात आले, अशी बातमी आहे. यावरच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाराज व्यक्त केली आहे आणि लवकरच काँग्रेस सोडणार असल्याचे संकेत दिले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Zeeshan Siddique Preparing to Quit Congress
Jammu and Kashmir : गुलमर्गमध्ये हिमस्खलन; एका पर्यटकाचा मृत्यू, अनेक पर्यटक अडकल्याची भीती, पहा थरारक Video

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले आहेत की, ''वरिष्ठ नेते फोन करून सांगतात तुझे वडील राष्ट्रवादीत गेले असले तरी घाबरू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत.'' ते म्हणाले, अजून मला पदावरून काढल्याचे अधिकृत असे पत्र आले नाही. (Latest Marathi News)

ते म्हणाले, भारत जोडो यात्रेतून मला, नांदेडमधून जाण्यास सांगण्यात आले. 10 किलो वजन कमी कर, मग राहुल गांधी यांच्यासोबत चालायला ये, असं सांगण्यात आलं. राहुल गांधी यांच्यासोबतचे लोक काँग्रेस संपवणार आहेत. मी आता पर्याय पाहत आहे, असं म्हणत त्यांनी काँग्रेस सोडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Zeeshan Siddique Preparing to Quit Congress
High Court : मोठी बातमी! मणिपूरमध्ये या आदेशामुळे भडकला होता हिंसाचार; हायकोर्टाने तो निर्णयच केला रद्द

ते म्हणाले, भारत जोडो यात्रेतून मला, नांदेडमधून जाण्यास सांगण्यात आले. 10 किलो वजन कमी कर, मग राहुल गांधी यांच्यासोबत चालायला ये, असं सांगण्यात आलं. राहुल गांधी यांच्यासोबतचे लोक काँग्रेस संपवणार आहेत. मी आता पर्याय पाहत आहे, असं म्हणत त्यांनी काँग्रेस सोडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

अजित पवार यांचं केलं कौतुक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक करत ते म्हणाले, अजित पवार यांनी मौलाना आझाद मंडळाला खूप फंड दिला. सिद्दीकी म्हणाले, काँग्रेसमध्ये अमादरा आमदार खुश नाहीत. लवकरच अनेक नेते काँग्रेस सोडू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com